“शिक्षण सप्ताह साजरा करणेबाबत..दि. २२ ते २८ जुलै, २०२४,celebration-Education-Week

 “शिक्षण सप्ताह साजरा करणेबाबत दि.२२ ते २८ जुलै, २०२४


आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.


शिक्षण सप्ताह चे वार निहाय उपक्रम सविस्तर पाहण्यासाठी व pdf download साठी येथे click करा.


उपक्रमाचे फोटो अपलोड करण्याची SCERT ची  अधिकृत link  click here 

foto upload link click Here

JPS Map / जिओटॅग Camera App link Click Here



परिशिष्ट 7

शिक्षा सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव

दिवस सातवा

28 जुलै 2024


विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्याच्या मदतीने कार्यरत आणि सेवानिवृत शिक्षक, शास्त्रज्ञ, सरकारी/निमशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे कर्मचारी, स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक, गृहिणी, आणि इतर कोणत्याही संस्था/समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकता किंवा शाळेसाठी मालमत्ता / साहित्य/ उपकरणे यांचे योगदान देऊ शकतात.

उ‌द्दिष्टे -

1. शाळांचे सक्षमीकरण करणे.

2. लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय

3. शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे.

4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण करणे.

विद्यांजली कार्यक्रमाचा व्याप्ती व वाढवण्यासाठी शिक्षा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पुढील उपक्रमांचे आयोजन केले जावे.

1. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे.

2. शाळेला मदत करणान्या सक्रिय स्वयंसेवकांची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लिहिणे.

3. समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरुकता निर्माण करणे. त्यासाठी प्रभात फेऱ्या पथनाट्य, पोस्टर मेकिंग, विद्यांजली कार्यक्रमासंदर्भात घोषवाक्ये स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

4. विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनो अभियान राबविणे.

6. शालेय परिपाठामध्ये शिक्षक, विद्यार्थी व डायट मधील अधिकारी यांचे मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे

7. विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे, स्थानिक रेडिओ वाहिन्या, पी एम ई विद्या चैनल्स यांच्या माध्यमातून जनजागृती करणे.

8. शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची समाज माध्यमे व प्रसार माध्यमे याद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी.

अपेक्षित परिणाम -

1. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढेल.

2. शाळांचे सक्षमीकरण होईल.

3. शाळा व समाज यामध्ये उत्तम नाते संबंध निर्माण होईल.

4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण होईल.



परिशिष्ट क्र. ६

शिक्षा सप्ताह, दिवस सहावा वार शनिवार दि. २७/०७/२०२४

Eco clubs for Mission LIFE Day

शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि #Plant4Mother या अभियान अंतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवार दि.२७/०७/२०२४ रोजी आयोजन करणे.

अ) शाळेमध्ये Eco clubs for Mission LIFE या थीम अंतर्गत Plant4Mother अभियान

आयोजित करण्यासाठी सूचना वृक्षारोपण मोहिमेचे दि. २७/०७/२०२४ रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे. शालेय परिसर, घर, सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे. शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात यावी. केंद्र शासनाच्या | निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान ३५ रोपे लावावीत.

विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग :- विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत "आणि त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत. यामुळे विद्यार्थी, त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल.

नावांचे फलक लावणे : विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा.

रोपाचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे :- विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक/अध्यक्ष/ सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी, पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करावी.

वरील उपक्रमाच्या अनुषंगाने-

१. जिओटॅग केलेले फोटो अपलोड करणे शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे जिओटॅग केलेले फोटो, सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षा विभाग, भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकर लिंकवर अपलोड करावेत.

foto upload link click Here

२. सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे- या मोहिमेबद्दल समाजात जाणीवजागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो Plant4Mother आणि एक पेड़ माँ के नाम हे हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करावेत.

ब) शाळांमध्ये मिशन लाइफसाठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबतच्या सूचना

शाळांमधील मिशन लाइफसाठी इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात. हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहांच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वतर्नशैलीला प्रोत्साहित करते.

इको क्लब हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती जाणून घेण्यास सक्षम करतात. केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील ८२३२ शासकीय शाळा व CBSE व इतर व्यवस्थापनाच्या ५३८६ शाळांनी इको क्लबची स्थापना करावी.

मिशन लाइफसाठी इको क्लबची स्थापना: विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी ज्या शाळांमध्ये इको क्लबची स्थापना केलेली नसेल त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांनी मिशन लाइफसाठी इको क्लब स्थापन करावेत आणि इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी.

नेतृत्व:

:- शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाइफसाठी इको क्लबचे प्रमुख / मार्गदर्शक असतील आणि इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमांचे आणि शैक्षणिक प्रगतीची देखरेख करतील. समन्वयकाची जबाबदारी :- मिशन लाइफसाठी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील पदव्युत्तर शिक्षक (PGT) किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) यांची नियुक्ती करावी. या शिक्षकाकडे इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयकाची जबाबदारी देण्यात यावी. हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांच्या तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनरावलोकनासाठी सादर करतील.

मिशन लाइफसाठी इको क्लबची रचना-

> इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील ४-५ विद्यार्थी असतील.

> मिशन लाइफसाठी क्लबचे इको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्याची नियुक्ती केली जाईल > शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावे.

★ ऊर्जा संवर्धन, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयांवर आधारित उपसमित्यांची स्थापना करावी.इको क्लव अंतर्गत उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करावे. प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे.


शिक्षण सप्ताह शुक्रवार दि २६ जुलै २०२४ चे पाचव्या दिवसाचे 'कौशल्य दिवस' संपूर्ण उपक्रम pdf मध्ये download करण्यासाठी येथे click करा.

 
     परिशिष्ट-४
शिक्षा सप्ताहः शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव
दिवस चवथा 
 गुरुवार दि. २५
जुलै २०२४ 

      सर्व शाळांमध्ये २५ जुलै २०२४ रोजी सांस्कृतिक दिन साजरा करणे.
 NEP २०२० मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आली आहे. २२-२८ जुलै २०२४ दरम्यान शिक्षा सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजेच दि. २५ जुलै २०२४ रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जावा. हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात यावा. 

सांस्कृतिक दिनाची उद्दिष्टे

१. सांस्कृतिक दिवसांमध्ये विविधता, जागतिक जागरुकता, परस्पर आदर, सर्जनशीलता, अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेच्या प्रचार करणे.

२. कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमांद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनविणे.

३. शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे.

हा उपक्रम सुसंवाद आणणे, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे, विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे, अभिव्यक्तीला चालना देणे, सौहार्दपूर्ण वातावरणास प्रोत्साहन देणे आणि कोणत्याही निर्बंधांशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या दिशेने देखील प्रयत्न करेल.

त्यासाठी पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.

> शाळांमध्ये विविध भाषा, वेशभूषा, खाद्यपदार्थ, कला, वास्तुकला, स्थानिक खेळ, चित्रकला, नृत्य, गाणी, नाट्य, लोक आणि पारंपारिक कला, पथनाट्य (नुक्कड नाटक), कठपुतळीचे कार्यक्रम, कथा-कथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

> लोक, प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम, सामुदायिक गायन, लोकनृत्य, शास्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इ. कलाप्रकारांतून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जाये.

> स्थानिक आणि पारंपारिक कलाकार/कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्यांचे कला प्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावे. किंवा शाळा स्थानिक कलाकार/कारागीर आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी भेटींचे आयोजन देखील करू शकतात.


> संपूर्ण शाळेत पेंटिंग डे' किंवा शाळेच्या परिसराचे संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावे. जेथे सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य त्यांच्या आवडीच्या रंग आणि माध्यमांसह काम करण्याचा आनंद घेऊ शकतात.

> सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात. स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बाल भवन आणि बाल केंद्र, पुरातत्व स्थळे, विविध प्रकारची संग्रहालये इत्यादींचे सहकार्य घेण्यात यावे.

उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे

१. राज्य/संघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपक्रम राबवले जाती तथापि, अशा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सक्रिय सहभाग असावा.

२. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण, सर्जनशील अ ३. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि मानवी हक उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

४ विशेष गरजा असलेल्या मलांचा (CWSN) सहभाग लक्षात घेऊन सर्व कार्यक्रमांची रचना करण्यात यावी.



परिशिष्ट-३

शिक्षा सप्ताह: शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस तिसरा

बुधवार दि. २४ जुलै २०२४ क्रीडा दिन


नवीन राष्ट्रीय धोरण (NEP 2020) मध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. या खेळांच्या माध्यमातून देशाथी संस्कृती, लोककला यांचा परिचय उत्तम रितीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे.

या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने २१ ऑगस्ट २०२३ रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत.

उद्दिष्ट्ये:- विद्यार्थ्याच्या पायाभूत अवस्थेपासूनच खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे यासाठी- १. खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्वाबद्दल जागरुकता वाढविणे.

२. समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे.

३. तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे.

४. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे

५. खेळ हा विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे.

६. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी. (विशेषता

भारताचे स्वदेशी खेळ)

७. विद्यार्थ्यामध्ये अभिमान, खिलाडूवृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे

८. विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणे.

९. विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यामध्ये सांघिक भावना वाढवणे.

१०. खेळातून विद्यार्थ्यामध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजविणे.

शिक्षण सप्ताहाच्या तिसन्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे. त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हंटले आहे. या अनुषंगाने

पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.

> शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील १ ते २ तासामध्ये विद्यार्थ्यासाठी विविध स्वदेशी खेळांचे

आयोजन करावे.

★ इयत्ता १ ली ते ५ वी साठी सापशिडी, पत्ते, शर्यत, गोट्या, सागरगोटे, भोवरा, टिपरी, लगोरी, लंगडी, फुगडी, आंधळी कोशिंबीर, चमचा लिंबू, सुई दोरा, दोरीवरच्या उड्या अश्या प्रकारचे खेळ घ्यावेत.

> इयत्ता ६ वी ते १२ वी साठी बुद्धिबळ, सारीपाट, खो-खो, कबड्डी, विटी दांडू, भालाफेक, मल्लखांब, धावणे शर्यत, लंगडी, लगोरी, ३ पायांची शर्यत, लांब उडी व उंच उडी, लेझीम, हे खेळ घ्यावेत.

> तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या ७५ स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी. शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघांचा, खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा.

स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू, शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी.

> पालक आणि नागरी समाज संस्था यांचे मदत घेण्यात यावी.

> सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समवेश करण्यात यावा.

अपेक्षित परिणामः-

विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल.वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव येईल.

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती, निष्पक्षता, संघकार्य आणि एकता ही मूल्ये रुजविली जातील.


क्रीडा शपथ नमूना


आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की, आम्ही या क्रीडामहोत्सवात सचोटीने भाग घेऊ. या क्रीडामहोत्सवात होणाऱ्या क्रीडाप्रकारात, आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू. क्रीडामहोत्सवी स्पर्धांच्या सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खिलाडूवृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू. आमच्या शाळा, केंद्र, बीट, तालुका, जिल्हा, राज्य व देशाचा सन्मान व गौरव होईल अशा इर्षेने या क्रीडामहोत्सवात भाग घेऊ. जय हिंद

क्रीडा शपथ नमूना
आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आमच्या शाळेच्या क्रिडा महोत्सवामधे आम्ही सर्व खेळामध्ये प्रामाणिकपणे, हिरिरीने आणि उत्साहाने भाग घेऊन सर्व नियमांचे एकनिष्ठेने पालन करु व खऱ्या खिलाडूवृत्तीने वर्तन करुन आपल्या शाळेचा व संस्थेचा सन्मान व खेळाचा गौरव वाढत राहिल असा प्रयत्न करु. जय हिंद

क्रीडा शपथ नमूना
मी खेळाडू म्हणून अशी शपथ घेतो/घेते की,  शालेय कीडा स्पर्धेत मी भाग घेत आहे. स्पर्धा आणि खेळाची शान व दर्जा उंचावण्यासाठी माझे कौशल्य पणास लावीन.
स्पर्धा व खेळाच्या अटी आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. पंचांचा निर्णय मान्य करीन. मी माझ्या शाळेचे आणि गावाचे नाव उंचावण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. खिलाडूवृत्ती, सचोटी, निकोप ईर्षा आणि खेळभावना या गुणांचे तंतोतंत पालन करीन.. जय हिंद. 


क्रीडा शपथ नमूना
आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की, आम्ही या क्रीडा महोत्सवात सचोटीने भाग घेऊ. या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा प्रकारात, आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू, क्रीडा महोत्सवातील सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खिलाडूवृत्तीने वागून पंचानी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू. आमच्या शाळेचा सन्मान व गौरव होईल अशा इर्षेने या क्रीडा महोत्सवात भाग घेऊ. 

जय हिंद


परिशिष्ट क्र. २

शिक्षा सप्ताह

दिवस दुसरा

मंगळवार दि. २३ जुलै २०२४

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस


राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथमिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर धोरणातील महत्वपूर्ण कार्यनिती पुढीलप्रमाणेः

१) पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण (ECCE ) याला प्राधान्यक्रम

२) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी(शासननिर्णय २७ ऑक्टोबर २०२१ )

३) उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन व अध्यापन साहित्याचे विकसन

४) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यांकन ५) बालकांच्या घरातील अध्ययनाकरिता पालकांचा व समुदायाचा सक्रीय सहभाग


पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे महत्व

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता २ री च्या अखेरीस आकलनासह वाचन व मुलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे होय. संबंधित कौशल्ये ही पुढील बाबीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतात.

बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचे विकसन

अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास निर्मिती.

समतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययन अंतर कमी करणे.

शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे.

सप्ताहाचा दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा.


उदिष्टे :

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम व कृती कार्यक्रम यांचे प्रदर्शन करणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाण-घेवाण करणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षण तज्ञ, पालक व समुदाय यांचा सक्रीय सहभाग घेणे.


पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसाकरीता आयोजित करावयाचे उपक्रम :

कार्यशाळा व परिसंवाद आयोजन: पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा / परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्राचे आयोजन करावे. बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचे आयोजन :

1. शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी.

https://www.youtube.com/watch%20?v=u4R9iLox3ik&t=9s&ab%20channel %20NCERTOFFICIAL

२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित व वितरीत करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका (मराठी, इंग्रजी, उर्दू) व जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जावू शकतात. शाळेच्या सकाळच्या सत्रातील ३० मिनिटे भाषेचे तसेच ३० मिनिटे गणिताचे खेळ घेतले जावू शकतात.

३. वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ञाच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता येतील व संख्याज्ञानाची आवड निर्माण करण्याकरिता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल.

४. जादुई पिटारा / PSE कीट :शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले PSE कीट / महाराष्ट्र शासनाचा जादुई पिटारा यामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्वप्राथमिक स्तरावर लेखनपूर्व व गणनपूर्व कृती करून घेण्यात याव्यात.

५. वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावरील संपर्क अधिकारी (नोडल अधिकारी) हे शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र घेवू शकतात.

६. विद्यार्थ्याना वर्गात, शाळेमध्ये समुदायाद्वारे विविध गोष्टीचे ऐकवाव्यात तसेच त्याचे वाचन

करावयास लावावे व विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित विविध प्रकारे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देता येईल.

७. राज्याद्वारे पुरविण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून (जादुई पिटारा. पीएसइ संच खेळाधारित अध्ययन / उपक्रम घेण्यात यावे तसेच बाहुलीनाट्याचे सत्र आयोजित करता येईल.

८. शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय, नृत्याचे कार्यक्रम तसेच मुळाक्षराची व अंकांची गाणी, विविध मुळाक्षराच्या व भौमितिक आकृत्याच्या रांगोळ्या, भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्ग सजावटी, पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरविण्यात यावे व याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कला व हस्तकौशल्याचा समावेश का करण्यात आला आहे या संदर्भाने जाणीव जागृती करता येवू शकते.

९. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याची उदिष्टे महत्व व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या चित्र फितीचे प्रक्षेपण करण्यात यावे.

9.https://www.youtube.com/watch?v=SOzerRQJmXq&ab%20channel = NCE%20RTOFFICIAL

2.https://www.youtube.com/watch?v=1%20HhhPPhQJdA&ab%20channel-NCE%20RTOFFICIAL

१०. शाळेमधील ग्रंथालयातील पुस्तके स्तरनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात यावीत व शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी एक तास वाचन तासिका घेण्यात यावी.

११. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य व तदनुषंगिक बाबीच्या साह्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे..

१२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोस्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागामार्फत दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र यामधील उपक्रमांचा देखील समावेश करता येईल.

समुदायाचा सहभाग :

 शाळांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले माता पालक गटांचा शाळेतील सदर उपक्रमात सक्रीय सहभाग घेण्यात यावा.

- उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक ८, ११ यामध्ये नमूद बाबीनुसार उपक्रमाचे आयोजन करून पालक व समुदायाचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.

निपुण प्रतिज्ञा click here



परिशिष्ट क्र. १

अध्यापन अध्ययन साहित्य (TLI 1) दिन दिवस पहिला

सोमवार दि. 22 जुलै, 2024


प्रस्तुत दिन साजरा करण्यासाठी आणि त्यानुषंगाने वर्गनिहाय उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना / तत्त्वे:

3.1 माध्यमिक स्तर (इयत्ता 11 वी आणि 12 वी ):

1. घोषवाक्ये असलेले पोस्टर्स: "पाणी कसे वाचवायचे" आणि "इतरांना कशी मदत करावी" यासारख्या विषयावर आधारित पोस्टर्स बनविणे.

2. कोडी : विज्ञान आणि गणित या विषयांवर अधिक लकेंद्रित असणारी कोडी तयार करायला सांगणे.

3. खेळ (मैदानी / शारीरिक आणि डिजिटल स्वरूपाचे): सामाजिक शास्त्रे, विज्ञान, गणित आणि भाषां इत्यादी विषयांशी संबंधित खेळांचे आयोजन करणे.

4. त्रिमितीय प्रतिकृती (मॉडेल्स): ऐतिहासिक वास्तू, शारीरिक रचना किंवा भौमितिक आकारांचे त्रिमितीय मॉडेल तयार करण्यासाठी माती किंवा पेपर-मॅचे (कागदी लगदा यासारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करणे.

5. बोर्ड गेम्स (पटावरील खेळ): अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याच्या दृष्टीने फॅब्रिक किंवा कार्डबोर्डवर (कापड किंवा पुट्ट्यावर ) खेळ विकसित करून शिकण्याच्या उद्देशांसह पटावरील खेळ तयार करणे.

6. भिंतीवरील तक्ते महत्वाच्या संकल्पना किंवा ऐतिहासिक कालखंड / सनावळ्या सारांशित करणारे तक्ते तयार करण्यासाठी जुनी वर्तमानपत्रे किंवा कापड वापरणे.

7. वाचन कट्टा (क्लब): वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे.


3.2 पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तर (इयत्ता 6 वी आणि 10 वी ):

1. कोडी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे.

2. खेळ : ल्युडो सारखे इतर खेळ तयार करणे.

3. खेळणी: कागद आणि बांबूच्या कांड्या यासारख्या किंवा तत्सम प्रकारच्या स्थानिक साहित्यापासून खेळणी बनविणे.

4. कठपुतळी / बाहुलीनाट्यः कपडे आणि टाकाऊ वस्तूंनी कठपुतळी किंवा बाहुली बनविणे. 5. गोष्टीचे कार्डस (Story Cards): पाच ते सहा स्व-स्पष्टीकरणात्मक गोष्टींचे कार्डस तयार करणे.

6. तक्ते बनविणे: "अन्न आणि भाजीपाला", "स्थानिक जारपेठ" "माझे कुटुंब" इत्यादी विषयावर आधारित तक्ते बनविणे.

7. वाचन कट्टा (क्लब): वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे.


3.3 पूर्वतयारी स्तर (इयत्ता 3 री ते 5 वी ):

1. तक्ते बनविणे: "अन्न आणि भाजीपाला", "स्थानिक बाजारपेठ", "माझे कुटुंब" इत्यादी विषयाचे तक्ते बनविणे.

2. रंगीत पेटी घन आणि आयताकृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिकटवून मुले अशा पेट्या तयार करू शकतात.

3. काउंस फळे, भाज्या, प्राणी इत्यादींचे कार्ड बनवणे.

4. मुखवटे प्राणी, पक्षी इत्यादींचे मुखवटे बनवणे.

5. वाचन कट्टा आणि कथाकथन सत्र यांचे आयोजन करणे.


3.4 पायाभूत स्तर (अंगणवाडी / बालवाडी (वय वर्ष 3 ते 6 ) आणि इयत्ता 1 ली व 2 री):

1. आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्य पेट्या -उदा. PSE Kit, महाराष्ट्राचा जादुई पिटारा, भाषा व गणित पेटी, इंग्रजी साहित्य पेटी (ELCRLM) तमेच इतर साहित्याच्या माध्यमातून कृती घ्याव्यात.

2. पालक व शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटिकांचे वैयक्तिक अथवा गटामध्ये सादरीकरण घ्यावे.

3. विविध माध्यमांच्या सहाय्याने ठसेकाम करून घ्यावे. उदा. पाणी, फुले, भाज्या, बोटांचे व हातांचे ठसे याप्रमाणे वैविध्यपूर्ण साहित्याचे ठसे घेता येतील.

4. पालक/शिक्षक/विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते, लोकनृत्य, लोकसंगीत सादरीकरण घ्यावे.

5. गोष्टींचा कट्टा - बालकांना स्थानिक व वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात यावे.


प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM DAY ) साजरा करणे विषयी मार्गदर्शक सूचना

शाळेत वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल म्हणून प्रदर्शन भरवावे. या प्रदर्शनामध्ये पुढील प्रमाणे स्टॉल्स मांडावेत.

1. वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्स- वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शविणारे स्वतंत्र स्टॉल्स मांडण्यात यावेत. प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यावीत. उदा. विविध भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलला "चला शिकूया भित्तिपत्रकातून " तर गोष्टीच्या स्टॉलला "चला गोष्टी ऐकूया, कठपुतळी किंवा पपेटच्या स्टॉलला "जर खेळणी बोलू लागली तर" अशी वैविध्यपूर्ण नावे द्यावीत.

2. शायरी बनवलेले शैक्षणिक साहित्य आशय शिकण्यासाठी व शिकविण्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरवावे.

3. संगीतमय शैक्षणिक साहित्य या स्टॉलवर शिक्षक व विद्यार्थी यांनी गाणी व संगीत वाद्ये यांचा अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने दिग्दर्शन करावे.

4. हस्तलिखितांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित कराव्यात.

5. शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन विविध विषयाच्या अनुषंगाने प्रतिकृती, चार्ट्स, फ्लॅश कार्ड, तरंगचित्र, बाहुल्या अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करून प्रदर्शनात मांडावे.

6. दिग्दर्शन वर्ग जवळची अध्यापक विद्यालये अथवा अध्यापक महाविद्यालये येथील छात्राध्यापकांच्या मदतीने नाविन्यपूर्ण अशा शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने असे वर्ग घ्यावेत अथवा त्यांना तसे स्टॉल लावण्याची संधी द्यावी.



You have to wait 20 seconds.


= "You have to wait %d seconds.".replace("%d", count); // decrease counter count--; } else { // stop timer clearInterval(timer); // hide countdown countdown_element.style.display = "none"; // show download link download_link.style.display = ""; } }, 1000); })();

SCERT ने दि १६ जुलै २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार....

उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण२०२ -० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह . विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.

शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम रावण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.संदर्भ क्र. १ तसेच सोबतच्या परिशिष्ट १ ते ७ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षण सप्ताहामधील उपरोक्त तक्त्यातील उपक्रमांची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत आपण पूर्ण करावी.शिक्षण सप्ताहादरम्यान आयोजित उपक्रमांची छायाचित्रे व माहिती Tracker वर upload करणेबाबत दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये माहिती जतन करून ठेवावी व मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी.

शिक्षण संचनालयाच्या दि. १६ जुलै २०२४ च्या परिपत्रकानुसार...

उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र. १ च्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह साजरा करणेबाबत संदर्भाधीन पत्रान्वये कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.शिक्षण सप्ताहामध्ये खालील प्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.

संदर्भ क्र. २ च्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे शिक्षण सप्ताह हा अंगणवाडी केंद्रामध्ये देखील राबविणेबाबत सूचित केले आहे. त्याअनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी आपल्या जिल्ह्यातील माहिला व बालविकास विभागाशी संपर्क व समन्वय ठेऊन योजनेची अंगणवाडी केंद्रामध्ये यशस्वीरीत्या अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी.

तरी उपरोक्त प्रमाणे राज्यामध्ये शिक्षण सप्ताहाची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व मंडळाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना सूचना देण्यात याव्यात. सहपत्र वरीलप्रमाणे


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ०१

foto upload link click Here


अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा व उपक्रम पहा.





टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. शिक्षण सप्ताह फोटो अपलोड करण्याविषयी मार्गदर्शन करावे

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .