पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) 2022 व 2023 शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती भरणेबाबत...

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) 2022 व 2023 शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती भरणेबाबत...


आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दि १० जुलै २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार...

उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) 2022 व 2023मध्ये शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या बँक खात्याची माहिती ऑनलाईन भरणेसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

आपणास शिष्यवृत्ती परीक्षा 2022 व 2023 साठी देण्यात आलेल्या लॉगीनमध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील बँक खात्याची माहिती भरलेल्या / न भरलेल्या शाळांची व विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरबाबत उपरोक्त संदर्भीय पत्रा तसेच संदर्भ क्र. 2 च्या झूम मिटींगनुसार आपल्या कार्यक्षेत्रातील माहिती न भरलेल्या शाळांना आपल्या स्तरावरून सदरची माहिती तात्काळ भरण्याच्या सूचना देणेबाबत आपणास कळविण्यात आले होते. परंतु वारंवार सुचना देऊनही अनेक शाळांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती भरलेली नसल्यामुळे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना रक्कम वितरणाच्या कामात विलंब होत आहे.

सदर विषयाचा आढावा घेण्यासाठी दिनांक 12/07/20224 रोजी दु. 12 वाजता झूम मिटींगचे आयोजन करण्यात आलेले आहे. उपरोक्त नमूद सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः आपल्या जिल्ह्याच्या सांख्यिकीय माहितीसह सदर बैठकीस उपस्थित रहावे. सदर बँक खात्याची माहिती वेळेत न भरल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास त्याची जबाबदारी आपणावर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.