आरटीइ २५ टक्के प्रवेश प्रक्रीया मुदतवाढ बाबत
संदर्भ :- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२४ २. मा.उच्च न्यायालय मुंबई, जनहित याचिका क्र.६१/२०२४, क्र. ८७/२०२४, व
क्र. १४८८७/२०२४, क्र. १५५२०/२०२४ तसेच रिट याचिका क्र. ३३१७/२०२४.
३. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/ प्र.प्र / आरटीई-५२०/२०२४-२५/४९४५,दि.१९/७/२०२४.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेस दिनांक २३.०७.२०२४ ते ३१.०७.२०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती.
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेचा आढावा घेतला असता आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी मुदतवाढ देणे आवश्यक असलयाचे दिसून येते. तरी दिनांक ०१.०८.२०२४ ते ०५.०८.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सर्व क्षेत्रिय अधिकारी यांनी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी देण्यात आलेली मुदतवाढ दिनांक ०१.०८.२०२४ ते ०५.०८.२०२४ पर्यंत यास स्थानिक वर्तमानपत्राव्दारे मोठया प्रमाणात मोफत प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .