सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरु करणेबाबत.
आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.
आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी .
अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.
निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.
शिक्षण संचालनालय ने दि १९ जुलै २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार......
संदर्भ :- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ०९/०२ / २०२४ २. मा. उच्च न्यायालय मुंबई, जनहित याचिका क्र.६१/२०२४, क्र. ८७/२०२४, व क्र. १४८८७/२०२४, क्र. १५५२०/२०२४ तसेच रिट याचिका क्र. ३३१७/२०२४.
उपरोक्त विषयी शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२४ यास मा. उच्च न्यायालय मुंबई, यांची अंतरिम स्थगिती असल्यामुळे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली नव्हती.
मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी जन हित याचिका व रिट याचिकेवर दिनांक १९/०७/२०२४ रोजी अंतिम निर्णय दिला आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दिनांक ०७/०६/२०२४ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी दिनांक २०/०७/२०२४ रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार दिनांक २२/०७/२०२४ पासून SMS जाण्यास सुरुवात होईल.
प्रवेश मिळाल्याचा SMS प्राप्त झालेल्या पालकांनी दिनांक २३/०७/२०२४ ते ३१/०७/२०२४ पर्यंत आपल्या जिल्हयातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करुन पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करुन घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात.
तरी आपणांस कळविण्यात येते की, सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी आपल्या जिल्हयातील सर्व तालुकास्तरावरील पडताळणी केंद्राची तपासणी करुन पडताळणी केंद्र अपडेट करण्यात यावी. पालकांना अडचण होणार नाही यांची दक्षता घ्यावी. तसेच पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE PORTAL वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थिती पहावी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील सूचनांचे पालन करावे अशा सूचनांना आपल्यास्तरावरुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, पुणे १.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .