PMeVidya शैक्षणिक वाहिनी उपक्रमाचा लाभ राज्यातील शिक्षक, विद्यार्थी, पालक, अधिकारी यांना उपलब्ध करून देणेबाबत..
आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.
उपरोक्त संदर्भीय क्र. १ अन्वये देशातील अनेक राज्यांमध्ये ( उदा. केरळ, आंध्र प्रदेश, गुजरात) विद्यार्थ्यांसाठी ई- शैक्षणिक साहित्याचे प्रक्षेपण राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या स्वतःच्या शैक्षणिक DTH वाहिनी मार्फत करण्यात येते. उपरोक्त संदर्भीय क्र. २ व ३ अन्वये राज्यासाठी ५ शैक्षणिक DTH वाहिन्या मंजूर झालेल्या आहेत. उपरोक्त संदर्भीय क्र. २ व ३ पत्रातील सूचनांनुसार सध्या ५ शैक्षणिक वाहिन्यांवर प्रस्तुत वाहिन्यांवर इयत्ता ९ वी ते १२ वी, शिष्यवृत्ती व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास यासाठी आवश्यक ई-साहित्य प्रक्षेपणासाठी दिनांक २९/०७/२०२३ पासून प्रक्षेपण करण्यात आलेले आहे,
उपरोक्त संदर्भ क्र. ०५ नुसार दिनांक ०५ ते ०७ जून २०२४ दरम्यान आयोजित कार्यशाळेत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यासाठी सध्या ५ शैक्षणिक वाहिन्यांवर प्रक्षेपणासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे, प्रस्तुत नियोजन सन २०२४-२५ अंतर्गत दिनांक १५ जून २०२४ ते ३०/०४/२०२५ दरम्यान लागू राहणार आहे.
संदर्भ क्र. ५ नुसार राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने तात्पुरत्या स्वरुपात ५ शैक्षणिक DTH वाहिन्यावर कार्यक्रम प्रक्षेपणाची कार्यवाही पूर्ण करून महिनावार नियोजन करण्यात आलेले आहे. सध्या दिनांक १५/०६/२०२४ पासून भारत सरकारने BISAC संस्था, अहमदाबाद यांच्या मदतीने वरील ०५ शैक्षणिक DTH वाहिन्यावर कार्यक्रम प्रक्षेपणाची कार्यवाही सुरु केलेली आहे. आपणास प्रस्तुत ०५ शैक्षणिक चॅनेल पुढीलप्रकारे Dish TV, DTH TV व यु-ट्यूब द्वारा लाभ घेण्यास उपयुक्त असतील, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,
लाइव्ह प्रक्षेपण खाली थेट पहा
SCERTM C113
https://www.youtube.com/live/KDG5xTFssm8?si=aARnQpf-zqf5teJd
SCERTM C114
https://www.youtube.com/live/vExJpQVrL8g?si=iS9iICEDxzXy_4OS
SCERTM C115
https://www.youtube.com/live/iLDuQcZ02UM?si=5Po7aV_8E5IY3Zkl
SCERTM C116
https://www.youtube.com/live/9kGUoZQSpmQ?si=NrnjDmOUCw-L7kSh
https://www.youtube.com/live/iqhP10ToO5c?si=dlwJambv2zJK4qDw
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .