STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४-२५ शाळा भेटीबाबत

STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४-२५ शाळा भेटीबाबत


आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

शाळाभेट लिंक click Here


शिक्षक सूचना मार्गदर्शिका download लिंक click here 


          पायाभूत चाचणी(PAT 1) जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत.
          उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था  व  खाजगी अनुदानित शाळा यांमधील इ ३  री ते ९वी या वर्गातील विद्यार्थांची प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांसाठीची पायाभूत चाचणी  दि १० ते १२ जुलै २०२४ या कालावधित होणार आहे . सदर चाचणी साठीच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरांपर्यंत पोहोच झालेल्या आहेत . शिक्षक सूचना व उत्तरसूची या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या  आहेत. संकेतस्थळावरील किंवा सोबत दिलेल्या लिंकवर जावून आपण शिक्षक सूचना व उत्तरसूची डाऊनलोड करून घेऊ शकता .याची माहिती आपले स्तरावरून आपल्या अधिनस्थ शाळांपर्यंत व शिक्षकांपर्यंत देण्यात यावी .
        शिक्षकसूचना लगेच पाहता येतील मात्र उत्तरसूची या परीक्षा नियोजनाप्रमाणे १० जुलै रोजी प्रथम भाषा, ११ जुलै रोजी गणित आणि १२ जुलै रोजी तृतीय भाषा या विषयाप्रमाणे त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर  प्रसिद्ध केल्या जातील . 



उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सन २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित, व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता ३ री ते ९ वीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित सर्व शाळातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी होणार आहे.

शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित ( सर्व माध्यम ) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.यावावत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तरी सदर कालावधीत आपण व आपल्या अधिनस्थ असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दि. १० ते १२ जुलै या कालावधीत शाळाभेटी कराव्यात व सदर भेटी संदर्भातील माहिती सोबत दिलेल्या लिंकमध्ये त्याच दिवशी भरण्यात यावी.


चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत

१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.

२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.

३) चाचणी कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.

४) चाचणी नंतर तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची रॅडमली तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे..

पायाभूत चाचणीचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर भरायचे असून यावावतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी. सोबत


शाळाभेट लिंक click Here


https://forms.gle/BzHnLJubWEP6TvKn6


अधिक माहिती साठी खालील पत्र वाचा.

download

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .