वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी ऑनलाइन पोर्टल बाबत
आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.
सन २०२४-२०२५ वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी ऑफलाइन प्रशिक्षणासाठी सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींची / शिक्षकांचे प्रशिक्षण ( नोंदणी, शुल्क, प्रमाणपत्र व इतर सहाय्य ) करिता ऑनलाइन पोर्टल विकसित करावयाचे आहे. त्या अनुषंगाने अधिकृत संगणक एजन्सी कडून खालील नमूद बाबींच्या समावेशासह वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या संदर्भाने नवीन ऑनलाइन पोर्टल विकसित करणे करिता दरपत्रक मागवण्यात येत आहे.
उपरोक्त विवरणामध्ये उल्लेखित कामे करण्यासाठी लागणारे साहित्य व सेवा याबाबतचे दर पत्रक वरील नमुन्यात या कार्यालयास उपलब्ध करून द्यावे.
अटी व शर्ती
1. दरपत्रक ( सर्व करांसहित) सीलबंद लखोट्यात संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३० या नावे दिनांक ०९.०७.२०२४ अखेर सायंकाळी ०५ वाजेपर्यंत सादर करण्यात यावे.
2. कोणत्याही परिस्थितीत अग्रीम स्वरूपात रक्कम दिली जाणार नाही.
3. विहित मुदतीनंतर आलेली दरपत्रके विचारात घेतली जाणार नाहीत.
4. दर अक्षरी व अंकी बाबनिहाय नमूद करावेत, त्यामध्ये खाडाखोड असू नये.
5. नमूद केलेले दर हे सर्व करासहित आकारलेले असावेत. याव्यतिरिक्त कोणतीही रक्कम कोणत्याही परिस्थितीत दिली जाणार नाही.
6. एकूण रकमेवर नियमानुसार टी. डी. एस. आकारला जाईल.
7. दर पत्रकासोबत शॉप अॅक्ट रजिस्ट्रेशन, पॅन कार्ड व जी.एस.टी. एजन्सी चे तत्सम प्राधिकरणाकडील नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत सादर करावी.
8. निवड झालेल्या संगणक एजन्सी धारकास उपरोक्त अटी व शर्ती मान्य असल्याचे लेखी हमीपत्र रुपये 500/- च्या स्टॅम्पपेपर वर द्यावे लागेल....
9. या कार्यालयाच्या आवश्यकतेनुसार वेळोवेळी उपस्थित राहून तांत्रिक बाबींचे सर्व अहवाल या कार्यालयास वेळेत व त्या वेळेच्या आवश्यकतेनुसार तात्काळ सादर करावे लागतील.
10. आपले देयक आपण पुरवलेल्या सेवा / वस्तू यांचे या कार्यालयाकडून गुणवत्तापूर्ण असल्याबाबत खात्री केल्यानंतरच अदा केले जाईल.
11. या कामासाठी योग्य संगणक प्रणाली विकसित करणे एजन्सीकडे सर्व data online ठेवण्यासाठी आवश्यक क्षमतेचे servers उपलब्ध असणे आवश्यक आहे.
12. उपरोक्त्यानुसार वेळोवेळी आवश्यक सेवा, दुरुस्त्या सुधारणा व इतर तांत्रिक बाबी अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी संबधित एजन्सीची असेल.
13. या कार्यालयास आपणाकडून प्राप्त होणाऱ्या उपरोक्तानुसार अपेक्षित सेवेत तत्परता व आवश्यक गुणवत्ता आढळून न आल्यास, काम असमाधानकारक आढळल्यास प्रस्तुत सेवा करार आदेश रद्द करण्यात येईल.
14. उपरोक्त कामातील अटी व शर्ती शिथिल करण्याचा तसेच कोणतेही दर पत्रक कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी राखून ठेवलेला आहे.
15. या संदर्भात यापूर्वी निर्गमित झालेले किंवा होणारे शासन आदेश परिपत्रक इत्यादी मधील तरतुदी व अटी / शर्ती बंधनकारक राहतील.
16. प्रस्तुत कामाची मुदत आदेश दिल्यापासून एक वर्ष असेल.
अधिक माहिती साठी खालील पत्र वाचा
Can you guide me for training addmission please
उत्तर द्याहटवाWhen is admission starts
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .