शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत शाळांमध्ये तिथी भोजन (स्नेहभोजन ) उपक्रम राबविण्याबाबत.

शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत शाळांमध्ये तिथी भोजन (स्नेहभोजन ) उपक्रम राबविण्याबाबत.

आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दि २४ जुलै २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार.....

केंद्रशासन निर्देशानुसार संपूर्ण देशभरात दि. २२ ते २८ जुलै, २०२४ या दरम्यान "शिक्षण सप्ताह" या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रस्तुत उपक्रमांतर्गत आठवड्यातील प्रत्येक दिवशी एका विशिष्ट उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रस्तुत शिक्षण सप्ताह दरम्यान शनिवार, दि. २७ जुलै, २०२४ रोजी “Eco Clubs for Mission Life / School Nutrition Day" आणि रविवार, दि. २८ जुलै, २०२४ रोजी “Community Involvement Day (Including Tithi bhojan, Vidyanjali etc. " समुदास सहभाग दिवस ( तिथी भोजन, विद्यांजली इ. इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

वरील प्रमाणे नमूद उपक्रमांतर्गत “समुदास सहभाग दिवस" या दिवशी राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधून तिथी भोजन (स्नेहभोजन) उपक्रम राबविला जाईल याकरीता सर्व शाळांना प्रोत्साहीत करण्यात यावे तसेच सर्व शाळांमधून तिथी भोजन (स्नेहभोजन) उपक्रमाची अंमलबजावणी होईल याकरीता क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत आवश्यक नियोजन करण्यात यावे.

केंद्रशासनाने निर्धारित केलेनुसार " तिथी भोजन (स्नेहभोजन) " उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याकरीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

1. गावातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना उक्त विशेष दिवशी " तिथी भोजन (स्नेहभोजन)" देण्याकरीता आवाहन करण्यात यावे.

2.सर्व शाळामधून समुदाय सहभाग दिवशी " तिथी भोजन (स्नेहभोजन) " उपक्रमाचे आयोजन शाळेने

करावे.

3. प्रस्तुत उपक्रमांतर्गत पूर्ण जेवण, मिठाई किंवा पूरक पोषक आहार (उदा. मोड आलेली कडधान्ये,

शेंगदाणे, सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते, मनुका, आक्रोड, बेदाणे, फळे, शिजविलेले पदार्थ, मिष्टांन्न) इत्यादीचा समावेश असलेले अन्न / आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावा.

4.तिथी भोजन (स्नेहभोजन) " उपक्रमांतर्गत भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व देणाच्या व्यक्तीनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा.

5.खाद्य पदार्थ ताजे व पौष्टिक असावे, तांदूळ / गहू / नाचणी, शेवगा शेंग/डाळी सोबत हिरव्या पालेभाज्या प्राधान्याने दिल्या जाव्यात. बाजारातील वेप्टनबध्द पदार्थ (जंक फूड) तसेच उघड्यावरील आणि शिळे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत, यासोबतच जंक फूडच्या हानिकारक प्रभावांबद्दल विद्यार्थी आणि पालक तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी.

6.विद्यार्थी हे देखील त्यांच्या दैनंदिन जीवनात अन्न पदार्थाची नासाडी कमी करुन, ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जन कमी करण्याकरीता त्यांचे बहुमूल्य योगदान देऊ शकतात याची जाणीव सर्व विद्यार्थ्यांना करुन देण्यात यावी.

7.खाद्य पदार्थाचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकाने शाळेत उपस्थित रहावे. तसेच खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्येच व दुपारच्या सुट्टीत तथा शालेय वेळेतच देण्यात यावेत.

8.सदर भोजनातून अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता संबंधित वितरक आणि शाळेने घेणे आवश्यक आहे. आहाराचे वितरणाकरीता आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी.

9.समुदास सहभाग दिवस ( तिथी भोजन, विद्यांजली इ.) उपक्रम राबविण्याकरीता संदर्भ ४ अन्वये दि. २३.०७.२०१४ रोजीच्या व्हि.सी. मध्ये देण्यात आलेल्या सर्व सूचना व निर्देशांचे पालन करुन उक्त उपक्रम अधिकाधिक शाळांमध्ये यशस्वीपणे राबविला जाईल याकरीता आवश्यक नियोजन आपले स्तरावरुन करण्यात यावे.

उक्त निर्देशाप्रमाणे दि. २८ जुलै, २०२४ रोजी "Community Involvement Day (Including Tithi bhojan Vidyanjali eto." समुदास सहभाग दिवस ( तिथी भोजन, विद्यांजली इ.) मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल तसेच राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमाबाबतची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर विहित वेळेत अद्यावत करणेत यावी.

अधिक माहिती साठी खालील पत्र वाचा.

download

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.