INSPIRE Award MANAK योजना सत्र 2024-25 करीता Online नामांकने सादर करणेबाबत.

INSPIRE Award MANAK योजना करीता Online नामांकने सादर करणेबाबत.



आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

INSPIRE Award MANAK योजना सत्र करीता Online नामांकने सादर करण्यासाठी येथे click करा.

शासनाने दि 2 जुलै २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार

उपरोक्त संदर्भाकीत विषयावे अनुषंगाने कळविण्यात येते की, INSPIRE Award MANAK योजनेअंतर्गत सत्र 2024-25 करिता इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गात शिकणा-या (सर्व माध्यम) शाळेतील विद्यार्थ्यांचे ५ उत्तम संकल्पनेवर आधारित मॉडेल्स www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर नामांकने सादर करवयाची आहेत. या करीता नामांकने सादर करण्याचा कालावधी ०१ जुलै २०२४ पासून सुरू झाले असून नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. तसेच ज्या शाळांनी अद्याप पर्यंत E-MIAS portal वर नोंदणी (Registration) केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याविषयी कळवावे.

सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपले स्तरावरून आपल्या जिल्हयातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टिने कार्यवाही करावी. तसेच जिल्हयातील नामांकने वाढविण्याच्या दृष्टिने प्रयत्न करावेत. त्यासाठी आपल्या अधिनस्त अधिका-यांच्या सभा घेऊन त्यांना जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच या संस्थेकडून आयोजित Onlineसभांना आपण आवर्जून उपस्थित राहावे. नामांकनाबाबतची स्थिती वेळोवेळी त्या त्या जिल्हयाच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांना कळविण्यात येणार आहे. त्याकरीता आपण आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना सूचना द्याव्यात. आपल्या जिल्हयातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.

download click here


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.