अंशकालीन निदेशक बाबत
MPSP च्या दि 12 जुलै २०२४ च्या परिपत्रकानुसार....
उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये याचिका क्र. ८७८६ / २०२१ व अन्य याचिकेच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेले दि.०२/०४/२०२४ व दि. ०८/०५/२०२४ रोजीचे आदेशानुसार याचिकाकर्त्या १९०५ अंशकालीन निदेशकांना तात्काळ हजर करुन घेण्याबाबत आपणांस कळविण्यात आले आहे.
दरम्यान सदर विषयाबाबत मा. उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०२/०७/२०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये मा. उपाध्यक्ष आणि मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांनी जे अंशकालीन निदेशक मा. उच्च न्यायालयात गेलेले नाहीत अशा अंशकालीन निदेशकांनाही हजर करुन घेण्यात यावे असे निर्देश दिलेले आहेत. सन २०२४-२५ व्या युडायस डेटानुसार इयत्ता ६ वी ८ वी च्या १०० च्या वर पटसंख्या असणाऱ्या शाळांची संख्या १७५१ आहे. या शाळांमध्ये कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयाकरिता प्रत्येकी १ याप्रमाणे ५२५३ अंशकालीन निदेशकांची पदे अनुज्ञेय होतात. रिट याचिका क्र. ८७८६ / २०२१ मध्ये मा. उच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याबाबत दि.१३/११/२०१७ रोजी आदेश दिल्यानंतर या अंशकालीन निदेशकांच्या सेवा समाप्त झालेल्या आहेत. सबब, या अंशकालीन निदेशकांच्या सेवा समाप्त झालेल्या वेळी कार्यरत असणाऱ्या अंशकालीन निदेशकांची माहिती शासनास सादर करावयाची आहे.
तथापि, उपरोक्तनुसार दि. १३/११/२०१७ रोजी मा. न्यायालयाच्या आदेशानंतर ज्या अंशकालीन निदेशकांच्या सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत, त्या कार्यरत असलेल्या अंशकालीन निदेशकांची शाळानिहाय माहिती सोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्रामध्ये भरून तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावी. जेणेकरुन सदर माहिती शासनास सादर करणे सोयीचे होईल.
अधिक माहिती साठी खालील पत्र वाचा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .