शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) - २०२२ मुलाखतीशिवाय' शिक्षक पदभरतीचा विकल्प दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 'पवित्र प्रणाली अंतर्गत उर्वरित रिक्त पदांच्या रूपांतरित फेरीतील (Converted Round) निवडयादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) - २०२२ मुलाखतीशिवाय' शिक्षक पदभरतीचा विकल्प दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 'पवित्र प्रणाली अंतर्गत उर्वरित रिक्त पदांच्या रूपांतरित फेरीतील (Converted Round) निवडयादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.



शासनाने दि 25 जून 2024 रोजी निर्गमित्त केलेल्या परिपत्रका नुसार

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या / खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी, तसेच 'शिक्षण सेवक' पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्यादृष्टीने 'अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) - २०२२' यामध्ये प्राप्त असलेले गुण, बिंदुनामावलीनुसार शिल्लक आरक्षण, जाहिरातीनुसार अध्यापनाचे उर्वरित विषय तसेच उमेदवाराने स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व लॉक केलेले प्राधान्यक्रम या सर्व बाबी एकत्रित विचारात घेवून सर्वसाधारण गुणवत्तायादी पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन तयार करून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) - २०२२ मध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित करण्याची, तसेच त्यांची शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली होती. यास्तरावरून उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही. आपल्या स्तरावरून उमेदवारांच्या सर्व संबंधित कागदपत्रांची / प्रमाणपत्रांची पडताळणी करावयाची आहे.

निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्त्या देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदांकरिता उमेदवारांची पात्रता तपासून ते पात्र असल्यासच त्यांच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्व-प्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्रे आपल्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

याबाबत स्पष्ट करण्यात येते की, उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आलेली आहे. परिणामी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक पात्रतेसाठीच्या मूळ कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रे / प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्रांशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरविता येणार नाही, याची कटाक्षाने नोंद घ्यावी.

मा. उच्च न्यायलय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक २५३४ / २०२४ व २५८५/२०२४ मध्ये दि. ०७/०३/२०२४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभरती प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवागनी दिली आहे. तसेच मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक २७५२ /२०२४ मधील मा. न्यायालयाचे दिनांक ०८/०५/२०२४ च्या आदेशान्वये तसेच याचिका क्रमांक २७८४ / २०२४ मधील दिनांक १२/०६/२०२४ च्या आदेशान्वये याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून उमेदवारांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश आहेत.

तसेच सदर नियुक्त्या देताना मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथील दाखल अन्य याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी. यास्तव नियुक्ती आदेशामध्ये त्याप्रमाणे नमूद करावे.

नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांना शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२३ / प्रक्र १७४ / टीएनटी-१ दिनांक २१/०६/२०२३ मधील मुद्दा क्रमांक ७ मधील तरतुदी व इतर तरतुदी विचारात घेऊन समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी.

कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीची कार्यवाही करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र क्रमांक १४०८ दिनांक २५/०२/२०२४ मध्ये (प्रत सोबत जोडली आहे) दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून आपल्या स्तरावरील पुढील कार्यवाही तात्काळ करावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक सविस्तर वाचा

download




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.