My Bharat पोर्टलवर शाळा/ महाविद्यालयांची नोंदणी व आंतरराष्ट्रीय योग दिवस (दि. २१.०६.२०२४) रोजीच्या उपक्रमात सहभागी होणेबाबत
विषयांकित प्रकरणी मा. सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांनी राज्यातील शाळा / महाविद्यालयांना युवक/ तरूणांमधील क्षमता/ कौशल्य विकसनाच्या दृष्टीने विकसीत करण्यात आलेल्या माय भारत (My Bharat) पोर्टलवर नोंदणी करण्याबाबत विस्तृत सूचना दिल्या आहेत.
तसेच आंतरराष्ट्रीय योग दिवस (दि. २१.०६.२०२४) च्या निमीत्ताने विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून घेतलेल्या उपक्रमांची नोंदणी व माहिती My Bharat पोर्टलवर भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मा.सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या निर्देशाप्रमाणे आपल्या अधिनस्त सर्व शाळा / महाविद्यालयांना माय भारत (My Bharat) पोर्टलवर नोंदणी करून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंद होईल यादृष्टीने आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. कार्यक्रमाची यशस्वीता होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .