शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न (Aadhar Seeded) करण्याबाबत
आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.
शासनाने दि १८ जून २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून निर्देश दिले आहेत कि.....
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. २६.०२.२०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दि.२८.०७.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
२. शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. करिता, शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न (Aadhar Seeded) करण्याची कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.
देविदास तेली
उत्तर द्याहटवारेशनकार्ड आधारकार्डला कोठे लिंक करून मिळेल
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .