यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये Import करून घेणेबाबत.

यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये Import करून घेणेबाबत.


mpsp ने  दि २९ जून २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि..... 

सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारकडून यु-डायस प्लस प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

दि. २८ जून, २०२४ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये २३,४७,३८६ एवढे विद्यार्थी Dropbox मधुन शाळांमध्ये import करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. यावर्षी यु-डायस प्लसमध्ये कोणत्याही शाळेस इयत्ता २ री ते इयत्ता १२वी पर्यंतच्या वर्गांमध्ये New Entry करता येणार नाही. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पध्दतीने माहिती Transfer करून दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश नोंदविता येईल.

शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळामध्ये विद्यार्थांना नव्याने प्रवेश दिले असल्यास त्या विद्यार्थ्यांना नव्याने Entry न करता Dropbox मधुन विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत Import करणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या Dropbox मधील Active for Import Status असलेले विद्यार्थी तात्काळ Import करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, जेणेकरून Dropbox मधील विद्यार्थ्यांची संख्या शुन्य करता येईल.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.