Student Portal Update 2024-25

 Student Portal Update 2024-25


Student Portal ला थेट login करण्यासाठी येथे click करा.


शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करता प्रमोशन सुरु करण्यात आले आहे.

प्रमोशन कसे सुरु करावे ? 

प्रमोशन करताना  कोणती काळजी घ्यावी ? 

हे पाहण्यासाठी येथे click करा 

1) शालेय शिक्षण विभागाच्या मान्यताप्राप्त खाजगी शाळांनी वर्ग , तुकडी व त्याचा अनुदान प्रकार इत्यादी माहिती स्कूल पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉगिन मध्ये माहिती नोंदवून शिक्षणाधिकारी यांच्या ऑनलाइन मान्यतेनंतर स्टुडेंट पोर्टल मध्ये सन २०२४-२५ या वर्षाकरीता विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करावी. शिक्षण विभागाकडील खाजगी शाळेव्यतिरिक्त इतर सर्व शाळांनी (जिल्हापरिषद/मनपा/नपा/ कटक मंडल /समाजकल्याण /आदिवासी/दिव्यांग कल्याण/ इतर मागास बहुजन कल्याण/इतर शासकीय) सन २०२४-२५ या वर्षाकरीता माहिती स्टुडेंट पोर्टल मध्ये नोंदवावी.


2) सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शाळेत नियमित शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्याची आधार क्रमांक विषयक नोंदी करून शाळेतील सर्वच विध्यार्थ्याचे आधार वैध (valid) करावेत, जेणेकरून संच मान्यता २०२४-२५ साठी ऐनवेळी अडचणी निर्माण होणार नाहीत.



1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी विहीत मुदतीत Approve/Reject करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास सदर Request ५२ दिवसानंतर रद्द करण्यात येतील. अशा विद्यार्थ्याची शाळा नव्याने Request टाकू शकते.


2) एखाद्या शाळेने त्यांच्या शाळेत नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्याची त्याच्या जुन्या शाळेस online Request पाठविल्यानंतर सदर Request जुन्या शाळेने ७ दिवसात Approve/Reject करणेआवश्यकआहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने तसे न केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांचेकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर विद्यार्थी बाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject १५ दिवसात करतील.


3) शाळेने केलेली first time Request जर केंद्रप्रमुख यांनी Reject केल्यास सदर Request नवीन शाळेसाठी पुन्हा (३ दिवसाच्या मुदतीसाठी) उपलब्ध होईल .


4) जर जुन्या शाळेने सदर online Request प्राप्त झाल्यानंतर जर ७ दिवसात Reject केली तर नवीन शाळा विद्यार्थी त्यांचेकडे शिकत असल्यास पुन्हा त्याच जुन्या शाळेस online Request पाठवतील व सदर शाळेने ३ दिवसाच्या मुदतीत Approve/Reject करणेआवश्यकआहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने काहीच कार्यवाही न केल्यास अथवा Reject केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांचेकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर विद्यार्थी बाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject १५ दिवसात करतील.


5) जर केंद्रप्रमुख यांनी प्राप्त Second time Request Reject अथवा १५ दिवसाच्या मुदतीत काहीच न केल्यास सदर online Request ही BEO Level ला १ महिण्याच्या मुदतीत Approve/Reject साठी उपलब्ध असतील .


6) सन २०२३-२४ मधील विद्यार्थ्याचे आधार वैध करण्यासाठी वेळोवेळी मुदत देऊनही अद्यापही काही शाळांतील विद्यार्थी Without AadhaarStudent/Invalid/Mismatch मध्ये दिसून येत आहेत. सदर विध्यार्थ्यांना आता पुढील वर्गात सन २०२४-२५ साठी promotion केले असले तरी असे विध्यार्थी आधार वैध स्थितीत नसतील तर त्या विधार्थ्याचे आधार वैध valid करता येणार आहे, त्यामुळे Without AadhaarStudent/Invalid/Mismatch बाबत शाळांनी काम करणे योग्य राहील.


अधिक माहिती पाहण्यासाठी खाली पहा.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.