क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३ - २४आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३ - २४ आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत.



आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

https://forms.gle/7yYfYGJ5YGxVFAiu7

दि 21 जून २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार....

शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर https://forms.gle/7yYfYGJ5YGxVFAiu7 या लिंकवर आपली आवेदने दिनांक २५ जून, २०२४ रोजी पासून दिनांक ०५ जुलै,२०२४ रोजी पर्यंत सादर करावीत. सोबत पुरस्काराचे वेळापत्रक जोडले आहे. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादित कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणांस संचालनालय स्तरावरुन अवगत करण्यात येईल.

सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना / लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचेल असे पाहावे.

प्रस्तावासाठीच्या आवश्यक :

1.अर्ज करण्यासाठी शिक्षक /मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान १० वर्षे आवश्यक 
2.शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक 
3.मुख्याध्यापकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी /प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक 
4.शिक्षकाचे /मुख्याध्यापकाचे  मागील मागील 05 वर्षाचे गोपनीय अहवाल पडताळणीसाठी सादर करावेत 
5.विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र 
6.शिक्षकांनी केलेल्या लगतच्या मागील ५ वर्षाच्या  सेवा कालावधीतील कार्याचे समितीकडून मूल्यमापन/गुणांकन करण्यात येईल 
7.प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत 
8.शिक्षकाच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

9.स्वतःचे तीन रंगीत फोटो व स्व प्रमाणपत्र सादरीकरणावेळी जमा करावेत.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा









टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .