आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत सन २०२४-२५

 आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत सन २०२४-२५








13/6/2024 Updates

मा. उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका(एल) क्र 14887/2024 प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने
सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत मा. न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार
२५ टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी.

अधिक माहिती साठी rte वेबसाईट वरील सूचना  खाली पहा.





 

SCERT ने दि 7 जून २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार....

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) शुक्रवार दिनांक ०७/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही. सी द्वारे करण्यात येणार आहे. आपणास ऑनलाईन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता खालील लिंक live उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

https://www.youtube.com/live/bNqUW9iKSX0?si=h163RMn3yxyszWs6

सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण LIVE पहा.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा





Tags

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .