शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक ०५ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४ या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.

शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक ०५ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४ याकालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.

आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

शिक्षण संचालकांनी दि ११ जून २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि...

   उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, राज्यामध्ये विविध कारणांमुळे बालके शाळाबाह्य होत असतात. तसेच विविध प्रकारच्या कामानिमित्त कामगारांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होत असते. तरी या शाळाबाह्य होणाऱ्या व स्थलांतरीत होणाऱ्या कामगारांच्या बालकांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक ०५ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४ या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्याचे ठरविले असून त्याबाबतची SOP व माहिती संकलनाचे formats तयार केली आहे. SOP ची प्रत व माहिती संकलनाचे formats सुलभ सदर्भासाठी सोबत जोडली आहे.

सदरचे महत्वपूर्ण सामाजिक काम हे केवळ शासनाच्या एकाच विभागाकडून पूर्णत्वास नेणे केवळ अशक्यप्राय बाब असल्याने यात संबंधित सर्व विभागांचा सहभागही तेवढाच महत्वाचा असल्याने सर्व विभागांनी एकजूटीने काम करणे गरजेचे आहे.

तरी आपणास विनंती करण्यात येते की, आपल्या विभागांच्या अधिनस्त असलेल्या सर्व ग्रामीण व नागरी भागातील सर्व स्तरावरील कार्यालयांना सदरच्या महत्वपूर्ण कामात सर्वोतोपरी मदत करण्याबाबत आदेशित करावे. तसेच ज्या काही योजना व इतरही काही सुविधा आपल्या विभागांकडून सदर बालकांना उपलब्ध करून देणे शक्य होईल त्या कृपया उपलब्ध करून द्याव्यात की जेणे करून सदर सर्वेक्षणाचे काम फलदायी व अर्थपूर्ण होईल.


उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक ०५ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४ या कालावधीमध्ये सर्वेक्षण हाती घेण्याच्या शासनाच्या सुचना असल्याने सदर सर्वेक्षण राबविण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने SOP व माहिती संकलनाचे formats तयार करून पुढील योग्य त्या त्वरीत कार्यवाहीसाठी सोबत जोडून पाठविली आहे. त्यानुसार सर्वेक्षणाच्या विहित पत्रकांमध्ये माहिती भरून विहित प्रमाणपत्रासह संचालनालयास सादर करावे. सदर प्रपत्रांमधील माहिती भरतांना केवळ (ISM V6) युनिकोड- “DVOT-SurekhMR" या Font चा वापर करून Font Size - 11 मध्येच भरावयाची आहे. याची कटाक्षाने नोंद घ्यावी. याबाबत आपण तसेच आपल्या अधिनस्त सर्व शिक्षणाधिकारी यांनी यातील सुचनांचे तंतोतंत पालन करून सर्वेक्षण राबविण्यासाठी कार्यवाही करावी.

यापूर्वी देखील शासनाकडून शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना बालकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते, त्याच धर्तीवर या सर्वेक्षणाशी संबंधित शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची संपर्कात राहून कार्यवाही करावयाची असून सदरचे काम पूर्णत्वास आणावयाचे आहे. शासनाच्या संबंधित विविध विभागांना याबाबत लिहिलेल्या पत्राची प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव सोबत जोडली आहे.

तरी याबाबत सर्व विभागिय शिक्षण उपसंचालक यांनी सदर SOP मधील सुचना लक्षात घेऊन आपल्या अधिनस्त सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व योजना) तसेच सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद मधील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने आदेशित करावे. त्याचप्रमाणे सर्व शिक्षणाधिकारी यांना त्यांचे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, महिला व बाल विकास अधिकारी तसेच सर्वेक्षणा संबंधित इतरही सर्व विभागातील अधिकारी तसेच तालुका व ग्रामिण स्तरावरील कार्यालयांशी संपर्क करून या बाबत सर्व नागरी व ग्रामिण स्तरावरील बैठकींचे नियोजन करण्याचे आदेश द्यावेत.

या कामासाठी सर्व विभागिय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी यांनी त्याचे कार्यालयात Excel मधील तज्ञ असलेल्या एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी की ज्यामुळे सर्वेक्षणाच्या विहित पत्रकांमधील माहितीचे वैधतीकरण योग्य व जलद रित्या होईल व सर्वेक्षणाची माहिती शासनास विहित वेळेत सादर करणे शक्य होईल. या नियुक्त केलेल्या सर्व जिल्हा व विभाग स्तरावरील नोडल अधिकाऱ्याची यादी संबंधित विभागिय शिक्षण उपसंचालक यांनी सर्वेक्षण सुरू होताच संचालनालयास सादर करावी.



अधिक माहिती साठी व संपूर्ण मार्गदर्शिका व सर्वे format download करा.

download


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .