प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता स्पर्धा आयोजित करण्याबाबत......

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता स्पर्धा आयोजित करण्याबाबत


आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

प्रस्तावना:-

केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दि. १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करुन विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होवून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत. प्रस्तुत योजनेंतर्गत परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून शासनाने उत्कृष्ठ परसबाग स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा परिणाम म्हणून राज्यामधील सुमारे २४,७४१ शाळांमध्ये परसबाग निर्माण झालेल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने राज्यामध्ये प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक पसरबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता परसबाग स्पर्धांचे आयोजन करण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत.

i. राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित ताजा भाजीपाला यांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा.

ii. प्रस्तुत उपक्रमाकरीता शाळांनी नजिकचे कृषि विज्ञान केंद्र, कृषि शाळा, कृषि विभागातील कृषि सहायक/ पर्यवेक्षक, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था (NGO), सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषि तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात यावे.

iii. राज्यात उत्कष्ट परसबागा तयार होण्यासाठी सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. याकरीता उत्कृष्ट परसबाग स्पर्धांचे तालुका व जिल्हास्तरावर आयोजन करण्यात यावे. त्यादृष्टीने उत्कृष्ट परसबाग स्पर्धेकरीता खालीलप्रमाणे बक्षिसांची रक्कम निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.



iv. प्रस्तुत परसबाग स्पर्धेचे मुल्यांकन करण्यासाठी शिक्षण, कृषी, आरोग्य, विभागातील

अधिकारी तसेच, आहारतज्ज्ञ व स्थानिक प्रगतीशील शेतकरी यांची समिती गठीत करण्यात यावी. तसेच, उत्कृष्ट परसबागांचे मुल्यांकन पुढील निकषांच्या आधारे करण्यात यावे.





प्रस्तुत उपक्रमाकरीता येणारा खर्च सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता केंद्र शासनाने योजनेंतर्गत व्यवस्थापन, संनियंत्रण व मुल्यमापन (MME) या घटकासाठी मंजूर केलेल्या निधीमधून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

तालुका स्तरावरील स्पर्धेचे मूल्यांकन करुन माहे ऑक्टोंबर, २०२४ अखेर तालुका स्तरीय विजेत्या शाळांची नावे संबंधित गटशिक्षणाधिकारी / अधिक्षक (शापोआ) यांनी घोषित करावीत. तसेच, तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक विजेत्या शाळेतील परसबागेची तपासणी करुन जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम निकाल डिसेंबर, २०२४ अखेर जाहीर करण्याची जबाबादारी संबंधित जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांची राहील. सदर स्पर्धा विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर आवश्यक त्या सविस्तर सूचना देण्याची कार्यवाही शिक्षण संचालक (प्राथ.) महाराष्ट्र, राज्य, पुणे यांनी करावी.

अधिक माहिती साठी खालील GR वाचा.


You have to wait 20 seconds.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.