ज्या शिक्षकांची नियुक्ती जाहिरात आणि टप्पा अनुदान १ नोव्हेंबर २००५ अगोदर पूर्वीची आहे अशा शिक्षकांच्या डीसीपीएस कपाती एनपीएस मध्ये लीगसी डाटा वर्ग करणेबाबत योग्य मार्गदर्शन मिळणेबाबत.
प्रति,
मा. प्रधान सचिव
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
मंत्रालय, मुंबई-३२
संदर्भ:- महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन जि कोल्हापूर यांचे पत्र क्र ४८/२०२३, दि.२७/१२/२०२३
उपरोक्त विषयाच्या संदर्भीय पत्रान्वये पत्रान्वये ज्या शिक्षकांच्या नियुक्तीची जाहिरात १ / ११ /२००५ पूर्वीची आहे पण नियुक्ती १ नोव्हेंबर २००५ नंतर आहे तसेच जे शिक्षक १/११/२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आले अशा शिक्षकांना १९८२ ची जुनी पेन्शन लागू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. अशा बऱ्याचशा शिक्षकांचा लीगसी डाटा एनएसडीएल कडे अद्याप वर्ग केलेला नाही सद्यःस्थितीत तो एनपीएस कडे वर्ग करण्याची कार्यपध्दती अंमलात आणली जात आहे. तो डाटा वर्ग करण्याऐवजी मा. मुख्यमंत्री यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणेनुसार पीएफ खात्यात वर्ग करावा लागणार असल्याबाबत संबंधित संघटनेने कळविलेले आहे. यास्तव योग्य त्या कार्यवाहीचे आदेश मार्गदर्शन होणेबाबत विनंती केलेली आहे.
सदर बाब आपल्या स्तरावरील असल्याने सदर पत्र उचित मार्गदर्शनास्तव आपणाकडे सादर करण्यात येत आहे.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे-१
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .