राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत.

राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत



आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

शासनाने दि ३१ मे २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि...

संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना करण्यात आली आहे. प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासुन ६ महिन्याच्या कालावधीत अहवाल शासनास सादर करावयाचा आहे. यास्तव मंत्रालयीन विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कार्यालयाकडून शासनाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारणाबाबतचे प्रस्ताव प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ३ व ४ येथील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून सादर करण्यास नमूद केले आहे. या अनुषंगाने प्रस्ताव दिनांक १६.५.२०२४ पुर्वी सादर करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक २ येथील दि. ९.५.२०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. तथापि, निवडणुकीच्या कामकाजासाठी विभागातील अधिकारी/कर्मचारी निवडणुक कर्तव्यावर असल्यामुळे दि.१५.५.२०२४ रोजीच्या पत्रान्वये दि. ३१.५.२०२४ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याबाबत विभागांना कळविण्यात आले होते.

अदयाप काहीच मंत्रालयीन विभागांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज व विधानमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा विचार करून वेतन त्रुटी निवारण समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशासकीय कारणास्तव दिनांक १०.६.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

सबब, आपल्या विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कार्यालयातील विभागाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबतचे अहवाल संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ३ व ४ येथील नमूद तरतुदींप्रमाणे कार्यवाही करून दिनांक १०.६.२०२४ पूर्वी वित्त विभाग/सेवा-९ कार्यासनाकडे (वेतनत्रुटी निवारण समितीकडे) आपल्या अभिप्रायासह सादर करावेत, ही विनंती.

तसेच, मंत्रालयीन विभागांकडून प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने वेतन त्रुटी निवारण समितीसमोर दि.१८.६.२०२४ ते दि.३१.७.२०२४ या कालावधीत सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. सुनावणीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे. (याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.) सुनावणीच्या वेळी आपल्या अधिनस्त कार्यालयांच्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आपले म्हणणे समितीसमोर मांडण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीचे संकलन करण्याबाबत व यापुढील प्रस्ताव वेतनत्रुटी समितीला सादर करताना हार्ड कॉपी सोबत ई-ऑफीसव्दारे (Vrishali Bhingarde या अकाऊंटवर) पाठविण्याबाबत आपणास दि. २८.५. २०२४ रोजीच्या पत्रान्वये यापुर्वी कळविण्यात आले आहे. कृपया त्याप्रमाणे कार्यवाही करावी.

वेतन त्रुटी निवारण समितीचे वेळापत्रक खाली पहा 



अधिक माहिती साठी परिपत्रक पहा.

download

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.