प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत दुर्गम भागातील शाळांची माहिती सादर करणेबाबत
प्राथमिक शिक्षण संचानालयाने दि 9 मे २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार
संदर्भ :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना आढावा बैठक नवी दिल्ली येथील निर्देश दि. ३०.०४.२०२४.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभाची दैनंदिन माहिती प्रत्येक शाळेने शिक्षण विभागाने सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम. डी. एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. केंद्रशासनाने देखील मध्यान्ह भोजनाचा लाभ वितरीत केलेनंतर त्यासंबंधीची नोंद विहित वेळेत पोर्टलवर शाळेद्वारे होणे आवश्यक असल्याचे निर्देश दिलेले आहेत. तथापि अनेक शाळा दुर्गम भागात स्थित असल्यामुळे कोणत्याही प्रकारची दूरध्वनी संदर्भातील कनेक्टीव्हीटी नसल्यामुळे संबंधित शाळांना नियमितपणे योजनेचा लाभ दिलेल्या विद्यार्थ्याची नोंद करणेकरीता अडचण येत असल्याचे अनेक जिल्ह्यांनी वेळोवेळी कळविले आहे.
केंद्र शासनाने दिनांक ३०.०४.२०२४ रोजी घेतलेल्या राज्यांच्या आढावा बैठकीतील निर्देशांच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यांकडून अशा दुर्गम शाळांची यादी घेऊन केंद्र शासनास सादर करणे बाबत कळविले आहे. सबब आपणास निर्देश देण्यात येत आहेत की, सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यामध्ये इंग्रजीमध्ये शाळांची यादी दि. १५.०५.२०२४ पर्यंत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वाक्षरीने अशा शाळांची यादी संचालनालयास अचूकपणे सादर करण्यात यावी. माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत संबंधित शाळेच्या ठिकाणी कनेक्टीव्हीटी आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात येणार आहे. सबब सर्व माहिती अचूक आणि खात्रीपूर्वक विहित वेळेत सादर होईल याची दक्षता घ्यावी.
अधिक माहिती साठी खालील पत्र वाचा
'e'
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .