केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीबाबत
शासनाच्या दि २४ मे २०२४ च्या परिपत्रकानुसार....
संदर्भ: शासन निर्णय समक्रमांक दि. २७.०९.२०२३
०२. केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरीता जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षका (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणान्या उमेदवारांमधून सेवाज्येष्ठता च गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल, अशी संदर्गीय शासन निर्णय दि. २७.०९.२०२३ अन्वये तरतूद विहित करण्यात आलेली आहे. यास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरीता सेवाज्येष्ठता यादी तयार करताना सहायक शिक्षकाची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर झालेला नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे. याअनुर्पगाने कार्यवाही होत नसल्याबाबत अर्जदार श्री पांडे यांनी शासनास कळविले आहे. तरी अर्जदार यांचे अर्जात नमूद केलेली बाब याची खातरजमा करण्यात येऊन, याबाबत शासन निर्णय दि. २७.०९.२०२३ मधील तरतूदीनुसार कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना संबंधित जिल्हा परिषदांना देण्यात याव्यात.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .