राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत

राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत


आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.


शिक्षण संचानालयाने दि २० मे २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि....

प्रति,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

जिल्हा परिषद, नंदुरबार, धुळे, जळगांव, बुलढाणा, जालना, छ. संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा,कोल्हापूर व सांगली.

विषय:- राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत.

संदर्भ :- १. शासन निर्णय क्र. एसवीवाय २०२३/प्र.क्र.३७/म-७, दिनांक ३१/१०/२०२३.

२. संचालनालयाचे पत्र क्र. जा.क्र. प्राशिसं/ पीएम-पोषण / २०२३-२४/ ०३२१७, दिनांक २२/०४/२०२४.

३. संचालनालयाचे पत्र क्र. जा.क्र. प्राशिसं/ पीएम- पोषण/ २०२३-२४/०३३८० दिनांक:-३०/०४/२०२४

         प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत संदर्भिय क्र. १ च्या शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यातील दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना (पीएम- पोषण योजना) दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्याचे निर्देश संदर्भिय पत्रान्वये आपणांस दिलेले आहेत. आपल्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील काही शाळांमध्ये आहार शिजवून देण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

        आपल्या जिलह्यातील दुष्काळग्रस्त घोषित तालुक्यातील विद्यार्थी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, याकरीता योग्य ती कार्यवही करण्यात यावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.