सन २०२३-२०२४ ची संचमान्यता व शाळा प्रणाली (स्कूल पोर्टल) मध्ये कार्यवाही करणेबाबत.

सन २०२३-२०२४ ची संचमान्यता व शाळा प्रणाली (स्कूल पोर्टल) मध्ये कार्यवाही करणेबाबत

शिक्षण संचालानायाच्या दि १७ मे २०२४ च्या परिपत्रकानुसार...

उपरोक्त विषयी सन २०२३ - २०२४ ची ड्राफ्ट स्वरुपात संचमान्यता आपल्या लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या. सदर उपलब्ध करुन दिलेल्या संचमान्यतेची तपासणी करुन, ज्या संचमान्यता दुरुस्ती करावयाच्या आहेत त्याच्या नोंदी करुन ठेवण्याबाबत आपणास सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार आपल्यास्तरावर सदरची कार्यवाही पूर्ण झालेली असेल. सन २०२३ - २०२४ च्या ड्राफ्ट संचमान्यता सरल प्रणालीतून सद्यःस्थिती रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे Change Management, Shifting of Post, Medium Change, Shifting of Student, Working Post, Change Category Add Post यांच्या व इतर दुरुस्ती करण्याची सुविधा आपल्या लॉगिनवर उपलब्ध झालेली आहे.

तरी ज्या शाळेचे विनाअनुदानित, अंशता अनुदानित, अनुदानित Management मध्ये बदल करावयाचे आहे, Medium बदल करावयाचे आहेत, Class Category बदल करणे, शिक्षकांची मान्य पदे वेगवेगळया टप्पा अनुदानस्तरा मध्ये ' Shifting करावयाची आहेत, तसेच चुकीच्या माध्यमामध्ये विद्यार्थी भरले असल्यास सदर विद्यार्थ्यांना योग्य माध्यमा मध्ये शिफ्ट करणे, कनिष्ठ महाविद्यालय Add Post करणे या व इतर सुधारणा आपल्यास्तरावर दिनांक १८.०५.२०२४ ते २८.०५.२०२४ या कालावधी मध्ये पूर्ण करुन घ्याव्यात म्हणजे योग्य व अंतिम संचमान्यता देणे सोईचे होईल.

शिक्षणाधिकारी यांच्या स्कूल / शाळा प्रणालीत सुपर लॉगिन मध्ये Saral School Data Verification हा टॅब उपलब्ध करुन दिलेला आहे. सदर टॅब मध्ये आपल्या अंतर्गत सर्व शाळांची दिलेल्या मुद्याची तपासणी करुन योग्य माहिती असलेल्या शाळांना अंतिम मान्यता द्यायची आहे व ज्या शाळांची माहिती चुकीची / अयोग्य आहे त्या शाळाबाबत जी माहिती सुधारणा करावयाची आहे ती आपल्या लॉगिन मध्ये उपलब्ध असलेल्या सुविधेचा उपयोग्य करुन माहिती सुधारित करुन घेण्यात यावी व त्यानंतर अशा शाळांना अंतिम मान्याता द्यावी.

सरल प्रणाली मध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनवर त्यांच्या अंतर्गत येत असलेल्या शाळांची यादी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यांचे अवलोकन केले असता इतर विभागाच्या (उदा. समाज कल्याण, अंपग कल्याण, आश्रम शाळा व इतर ) शाळा दिसून येत आहेत. तसेच आपल्या विभागाच्या मान्यताप्राप्त शाळा इतर विभागाकडे असल्याबाबत वेगवेगळ्या जिल्हयातून पत्र प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शाळेच्या सुपर लॉगिन मध्ये Transfer of School from or To another Department हा टॅब उपलब्ध करुन दिला असून त्यामध्ये आपल्या अंतर्गत इतर विभागाच्या शाळा असतील अथवा आपल्या विभागाच्या शाळा इतर विभागाकडे असतील तर या शाळांची माहिती मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सुविधेचा उपयोग्य करुन आवश्यकती कार्यवाही उक्त कालावधी मध्ये पूर्ण करुन घेण्यात यावी.

उपरोक्त कार्यवाही दिलेल्या कालावधी मध्ये तातडीने पूर्ण करुन घेण्यात यावी. अन्यथा आपणावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा

download click here

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.