आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ बाबत.

आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ बाबत




शिक्षण संचानालयाने दि 12 मे २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि......

विषय:- १. आरटीई प्रवेश प्रक्रीया २०२४-२५ बाबतसंदर्भ:- १. मा. उच्च न्यायालय मुंबई, जनहित

याचिका (एल) / क्र. १४८८७/२०२४, जनहित याचिका (एल) क्र. १५५२०/२०२४

२. शासन पत्र क्र. आरटीई२०१९/प्रक्र. २५/एसडी - १ दिनांक १०.०५.२०२४

महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क ( दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागासवर्ग बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी २५ टक्के प्रवेश करण्याची पदत) नियम २०१३ मध्ये तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सकतीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मध्ये दिनांक ०९.०२.२०२४ रोजीचया अधिसूचनेव्दारे सुधारणा करण्यात आलेली आहे. सदर अधिसूचनेविदुधद मा. उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका (एल) १४८८७ / २०२४, जनहित याचिका (एल) क्र.१५५२० / २०२४ व इतर सलंग्न रिट याचिका दाखल झालेल्या आहेत. जनहित याचिका (एल) १४८८७ / २०२४ व इतर सलंग्न रिट याचिकांमध्ये दिनांक ०६.०५.२०२४ रोजी मा. उच्च न्यायालयासमोर सुनावणी आयोजित करण्यात आली होती. सदर सुनावणीवेळी मा. उच्च न्यायालयाने दि.०९.२.२०२४ रोजीच्या अधिसूचनेस स्थगिती दिलेली आहे. तसेच जनहित याचिका (एल) क्र. १५५२०/२०२४ मध्ये दि.०७.०५.२०२४ रोजी झालेल्या सुनावणीवेळी दिनांक ०९.०२.२०२४ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने संचालनालयाचे दिनांक ०६.०३.२०२४ आणि दिनांक ०३.०४.२०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकामध्ये सुधारणा करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.

तथापि मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सन २०२४- २५ या वर्षाची आरटीई प्रवेश प्रक्रीया यापूर्वीचा नियमानुसार राबविण्यासाठी आवश्यक ते बदल आरटीई पोर्टलवर करण्याबाबत शासनाच्या संदर्भ पत्र क्र. २ अन्वये निर्देश दिलेले आहेत. तसेच जनहित याचिका (एल) क्र.१५५२०/२०२४ मध्ये दि.०७.०५.२०२४ रोजी झालेले आदेश विचारात घेऊन दिनांक ०६.०३.२०२४ व ०३.०४.२०२४ रोजीची परिपत्रके रद्द करुन स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित ) आणि महानगर

पालिका शाळा (स्वयंअर्थसहाय्यीत शाळा) यांचा समावेश करुन आरटीई प्रवेश प्रक्रीया राबविण्यासाठी नव्याने परिपत्रके निर्गमित करण्याची तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.

तरी मा. उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका (एल) १४८८७ / २०२४ जनहित याचिका (एल) क्र.१५५२०/२०२४ व इतर सलंग्न रिट याचिका व शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रकीयची तात्काळ अंमलबजावणी आपल्या स्तरावर करण्यात

याबी.

अधिक माहिती साठी परिपत्रक साठी click HERE

महाराष्ट्र शासनाने दि १० मे २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून निर्देश दिले आहेत कि..

महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (वंचित व दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी २५ टक्के प्रवेश करण्याची पध्दत) नियम, २०१३ मध्ये तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ मध्ये दि. ०९.०२.२०२४ रोजीच्या अधिसुचनेद्वारे सुधारणा करण्यात आलेली आहे.

२.सदर अधिसुचनेविरूद्ध मा. उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका (एल)/ क्र. १४८८७ २०२४, जनहित याचिका (एल )/क्र. १५५२०२०२४ व इतर संलग्न रिट याचिका दाखल झालेल्या आहेत. जनहित याचिका (एल) १४८७७/२०२४ व इतर संलग्न रिट याचिका यामध्ये दि. ६.५.२०२४ रोजी मा. उच्च न्यायालयासमोर सुनावणी आयोजित करण्यात आलेली होती. सदर सुनावणी वेळी मा. उच्च न्यायालयाने दि.०९.०२.२०२४ रोजीच्या अधिसुचनेस स्थगिती दिलेली आहे. तसेच जनहित याचिका (एल) क्र. १५५२०/२०२४ मध्ये दि. ७.५.२०२४ रोजी झालेल्या सुनावणी वेळी दि. ०९.०२.२०२४ रोजीच्या अधिसुचनेच्या अनुषंगाने शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी दि.०६.०३.२०२४ आणि ०३.०४.२०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकामध्ये सुधारणा करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मा. उच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन सन २०२४-२५ या वर्षाची आरटीई प्रवेश प्रक्रिया यापुर्वीच्या नियमानुसार राबविण्यासाठी आवश्यक ते बदल आरटीई पोर्टलमध्ये करण्यात यावेत. तसेच जनहित याचिका (एल) क्र. १५५२०/२०२४ मध्ये दि.०७.०५.२०२४ रोजीचे आदेश विचारात घेऊन दि. ०६.०३.२०२४ आणि दि. ०३.०४.२०२४ रोजीची परिपत्रके रद्द करून स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा ( विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वयंअर्थसहाय्यीत शाळा) यांचा समावेश करून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नव्याने परिपत्रके निर्गमित करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.