आरटीई प्रवेश प्रक्रीया २०२४-२५ बाबत

आरटीई प्रवेश प्रक्रीया २०२४-२५ बाबत



प्राथमिक शिक्षण संचानालयाने दि २२ मे २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि...

सन २०२४-२५ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने दिनांक १७.०५.२०२४ पासून सुरु करण्यात आलेली आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेच्या कामकाजासाटी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकाचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असलयाने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१.०५.२०२४ असून पालकांनी मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश प्रक्रीया जूनमध्ये सुरु होत असल्याने आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेस दिनांक ३१.०५.२०२४ नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही.

तरी पालकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची कृपया काळजी घ्यावी, तसेच स्थानिक स्तरावर व्यापक प्रमाणात याबाबत प्रसिध्दी देण्यात यावी.

अधिक माहिती साठी खालील पत्र वाचा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.