इयत्ता १० वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण लेखाशिर्ष- २२०२३०५६ या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपध्दती.

इयत्ता १० वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण लेखाशिर्ष- २२०२३०५६ या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपध्दती



शिक्षण संचालनालयाने दि 6 मे २०२४ रोजी रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार

शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एफईडी / १०९६/प्र.क्र. १९७८ / ९६ / साशि-५ दिनांक १३ जून १९९६ अन्वये १९९६-९७ पासून शासनमान्य अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे. किमान १५ वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य असणा-या पालकांच्या पाल्यांना ही सवलत मिळू शकते.. या सवलतीसाठी ७५ टक्के उपस्थिती व चांगली वर्तणुक असणे आवश्यक असून अनुत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सदरची सवलत त्या वर्षापुरती रोखण्यात येईल. मात्र तो विद्यार्थी उत्तीर्ण होताच ही सवलत पुढील वर्षात पूर्ववत चालू होत असते.


इयत्ता १० वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण लेखाशिर्ष- २२०२३०५६ या शैक्षणिक यवलत योजनेचा लाभ हा लाभार्थ्यां पर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व सदर योजनेबाबत संपूर्ण राज्यात एकसुत्रि पणा रहावा या करीता या योजनेबाबतची लाभार्थ्यापासून ते संचालनायपर्यंतची करावयाची कार्यवाही/कार्यपध्दती खालीलप्रमाणे विहित नमून्यात सादर करण्यात येत आहे.

सोबत:-

१) सदर शैक्षणिक सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालकांनी मुख्याध्यापक / प्राचार्य यांचेकडे करावयाच्या अर्जाचा नमूना प्रपत्र- १

२) शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी / मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी भरावयाचा नमूना:- प्रपत्र- २

३) शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (योजना) यांचे कार्यालयात सादर करावयाचा मांगणीचा नमूना प्रपत्रः ३

४) मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. यांचेकडे सादर करावयाचा बिल फॉर्म नमूना प्रपत्र - ४

५) राज्यातील अशासकीय माध्यमिक शाळांतील उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना तसेच शासकीय अध्यापक महाविद्यलयातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षण सर्व स्तरावर ( इ. १ ली पदव्युतर स्तर) विहित दराने अर्थसहाय २) प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना सर्व स्तरावर ( इ. १ ली ते पदव्युतर स्तर) विहित दराने अर्थसहाय फ्लो चार्ट (कार्यपध्दती) प्रपत्र - ५

अधिक माहिती साठी व सर्व फॉर्म नमुन्यासाठी खालील परिपत्रक पहा.

download

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.