पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत- शुद्धीपत्रक.
आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.
मा. शिक्षण संचालकांनी दि 15 /5/2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार
विषय :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता
८ वी) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत...
संदर्भ :- १. शासन निर्णय क्र एफईडी ४०१४/६४३/प्र.क्र./ एसडी-५ दिनांक १५.११.२०१६.
२. शासन शुद्धीपत्रक क्रमांक:-एफईडी ४०१४/६४३/प्र.क्र./ एसडी-५ दिनांक ७ मे २०२४.
उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय शासन शुद्धीपत्रान्वये संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णया मधील मुद्दा क्रमांक १४ (शिष्यवृत्तीचे वितरण) याबाबत संदर्भ क्रमांक २ अन्वये शासन स्तरावरुन शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे. सदरचे शुध्दीपत्रकामध्ये “ मुद्दा क्र.१४ (शिष्यवृत्तीचे वितरण):- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक यांच्या संयुक्त बँक खात्यात (विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करुनच देय रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी” याप्रमाणे दुरुस्ती करण्यात आलेली आहे. सदरचे शुद्धीपत्रक पुढील कार्यवाहीसाठी सोबत जोडून पाठविण्यात येत आहे. तरी इयत्ता ५ वी व ८ वी मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे बँक डिटेल्स भरताना सदर शुध्दीपत्रान्वये कार्यवाही करण्यात यावी.
अधिक माहिती साठी परिपत्रक download करण्यासाठी येथे click करा.
शासनाने दि 7 मे २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करून निर्णय घेतला आहे कि....
उपरोक्त संदर्भ क्र.१ 15/11/2016 च्या शासन निर्णयामधील "मुद्दा क्र. १४ (शिष्यवृत्तीचे वितरण):- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत त्यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी. "
याऐवजी
“मुद्दा क्र. १४ (शिष्यवृत्तीचे वितरण):- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक यांच्या संयुक्त बँक खात्यात (विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करुनच देय रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्याच्या अर्जासोबत विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचे आई / वडील/ पालक यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी." असे वाचण्यात यावे.
अधिक माहिती साठी खालील 7 मे 2024 gr वाचा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .