निवडणूक कर्तव्य / ड्युटी आदेश रद्द कारणे, पुरावे व अर्ज

निवडणूक कर्तव्य / ड्युटी आदेश रद्द कारणे, पुरावे व अर्ज 

 



                      सर्व कर्मचाऱ्यांच्या आता इलेक्शन ड्युटी लागली आहे परंतु पुढील कारणांमुळे आपली इलेक्शन ड्युटी कॅन्सल होऊ शकते त्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या अर्जासोबत कारण त्यासंबंधीचा पुरावा व शिफारस जोडायची आहे त्यानंतरच इलेक्शन ड्युटी रद्द होऊ शकते.


1. अधिकारी/कर्मचारी दिव्यांग (PDW) असले तर
दिव्यांग (PDW) असलेबाबत सक्षम अधिकारी यांचा दाखला जोडवा.

2. अधिकारी/कर्मचारी गरोदर (Pregnant) अत्तलेबाबत
गरोदर (Pregnant) असलेबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा. 

3. अधिकारी/कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असलेबाबत
संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट शिफारस पत्र अत्यावश्यक सेवेचे कामाचे वर्णन व कारण नमुद करावे.

4. अधिकारी / कर्मचारी स्तनदा माता (Lactating Mother) असलेबाबत
स्तनदा माता (Lactating Mother) असलेबावत मक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडवा.

5.अधिकारी / कर्मचारी निलंबित असले तर- 
संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.

6. अधिकारी /कर्मचारी फरार असलेबाबत-
 संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.

7. अधिकारी/कर्मचारी दिर्घ मुदतीचे रजेवर असलेबाबत 
(दिनांकापूर्वी मान्य रजेचे प्रकरण वोडावे ) अधिकारी / कर्मचारी दिनांक ३१ मे २०२४ रोजी संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह पत्र जोडावे. सेवा पुस्तक नोंद जोडावी)
8. सेवानिवृत्त होत असलेबाबत 
संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह पत्र जोडावे. सेवा पुस्तक नोंद जोडावी)

9. अधिकारी /कर्मचारी गंभीर आजारी असलेबाबत
१. गंभीर आजारी असलेबावत सक्षम वैद्यकीय अधिकारी  दाखला जोडावा 
२. संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.

१०. अधिकारी / कर्मचारी हे देशाबाहेर खासगी कामात्ताठी मान्य प्रबासी रजेवर असलेबाबत 
(देशांतर्गत खासगी कामासाठी प्रवासी रजेबर असल्यास अर्ज स्विकारू नयेत) संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे, (निवडणूक आदेश दिनांकापूर्वी मान्य रजेचे प्रकरण व व्हिसा व विमान तिकीट जोडावे)

११. अधिकारी / कर्मचारी हे शासकीय कामानिमित्त परदेशी अथवा देशांतर्गत प्रवास करीत असलेबाबत संबंधित अधिकारी/कर्मचारी कान करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे. प्रवास दौरा पत्र जोडावे

12. अधिकारी / कर्मचारी यांचे मतदानकेंद्रावरील दुबार आदेश असलेबाबत
ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी / कर्मचारी कामास तयार आहेत. त्या विधानसभा मतदारसंघाकडील सहा निवडणूक निर्णय अधिकारी यानी आदेशावर शिफारस करावी, व मतदान केंद्रावरील नियुक्तीचा जो आदेश रदद करावयाचा आहे त्याची स्पष्ट छायाप्रत जोडावी.
टिप- याबाबत तर्व विधानसभा मतदार संघाने प्रमाणपत्र दिले आहे

१३. अधिकारी /कर्मचारी हे निवडणूकीचे कामासाठी अन्य विधानसभा मतदारसंघाकडे कार्यरत असलेबाबत -  टिप याबाबत सर्व विधानसभा मतदार संघाने प्रमाणपत्र दिले आहे
ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी / कर्मचारी प्रत्यक्ष कामास आहेत. त्या विधानसभा मतदारसपाकडील सहा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेशावर शिफारस फराबी, व अधिकारी/कर्मचारी मामा जे काम दिले आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करावा मतदान केंद्राचरील नियुक्तीचा जो आदेश रदद करावयाचा आहे त्याची स्पष्ट छायाप्रत जोडावी

१४. मतदान केंद्रावरील नियुक्तीबाबत तहसीलदार यांनी योग्य कागदपत्रे, आब कार्ड इत्यादीचा संदर्भ घेवून स्पष्ट शिफारस करावी. कर्मचारी चतुर्थ श्रेणी / क्लास ४ मध्ये कार्यरत असलेबाबत (NIC कडील डेटा मध्ये कर्मचारी अन्य क्लास मध्ये असल्यास) तथापि कर्मचारी प्रत्यक्ष काम चतुर्थ श्रेणी / क्लास ४ मध्ये करीत असलेबाबत.

१५. अधिकारी/कर्मचारी हे बरिष्ठ पदावर (नायब तहसीलदार, व तहसीलदार, सहायक आयुक्त व या श्रेणीपेक्षा वरील श्रेणी परंतू महसुल, मनपा, विभागाशी संबधित अधिकारी, तसेच आय ए एस व समकक्ष) कार्यरत असलेबाबत
मतदान केंद्रावरील नियुक्तीबाबत तहसीलदार यांनी योग्य कागदपत्रे, आव कार्ड इत्यादीचा संदर्भ घेवून स्पष्ट शिफारस करावी.

१६. अधिकारी/कर्मचारी यांची जिल्हा बाहेर बदली झाली असलेबाबत
संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे. (बदली आदेश व कार्यमुक्ती आदेश जोडावा)

१७. अधिकारी/कर्मचारी मयत झाले तर
संबधित अधिकारी/कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे.

१८. अधिकारी / कर्मचारी यांचा अपघात झाला असले तर
अपघात झाला असले यावत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा. अधिकारी/कर्मचारी यांचे कुटूबीयाकडून अर्ज आला असल्याम अपघातग्रस्त अधिकारी/कर्मचारी यांचे चालू दिनांक असलेले छायाचित्र जोडावे

१९. अधिकारी/कर्मचारी यांचा स्वतःचा किंवा मुलाचा, मुलीचा विवाह असल्याबाबत-
 (मतदान दिनांका पूर्वी व नंतर ३ दिवस) इतर नाते संवधातील अर्ज स्विकारू नये.
छापील लग्न पत्रिका व कार्यालय बुकींग पावती, रजिस्टर विवाह असल्यात रजिस्ट्रेशन कार्यालयाकडीन टोकन पावती सादर करावी. 
                      वरील तक्ता अ. क्र तपासणी मी केली असून मी, श्री/श्रीमती. अधिकारी ..........नुसार संबधित अधिकारी / कर्मचारी यांनी दिलेल्या अर्जातील कागदपत्राची योग्य ती तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी विधानसभा मतदार संच शिफारस करतो/करते की, NIC मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या संगणकीय आज्ञावलीमध्ये खाली नमुद केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना निवडणूक २०२४ चे अंतर्गत निवडणूक कामातून वगळण्यात यावे.
अर्जदाराचे नाव.....
अर्जदाराचे कार्यालयाचे नाव.....
अर्जदाराचा दुरध्वनी क्रमांक.....
अर्जदाराचा सुस्पष्ट अक्षरातील ई मेल.....
अर्जदाराचा मतदान केंद्रावरील नियुक्ती आदेशामधील Employee Code....
नाव :-......
निवडणूक निर्णय अधिकारी
विधानसभा मतदार संघ

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. एखादा कर्मचारी राजकीय पक्षाचा
    कार्यकर्ता असेल तर काय तरतुद आहे?

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .