जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्ष २०२३ २४ अखेर करावयाच्या कामकाजाबाबत.

जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्ष २०२३-२४ अखेर करावयाच्या कामकाजाबाबत.



ग्रामविकास विभागाने दि २३ एप्रिल २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार

विषयांकित प्रकरणी संदर्भाकित दि. ०२.०४.२०२४ रोजीच्या पत्रान्वये शासनाने जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्ष २०२३ - २४ अखेर करावयाच्या कामकाजाबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विहित मुदतीत सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांनी कार्यवाही करणे अपेक्षित होते. तथापि, बहुतांश अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा लोकसभा निवडणूकीच्या कामासाठी अधिग्रहित केल्या असल्याने तसेच दि. ३१.०३.२०२४ रोजी सादर केलेल्या देयकांचे कोषागार कार्यालयाकडून अद्याप धनादेश प्राप्त न झाल्याने लेखांकन प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची विनंती अनेक जिल्हा परिषदांकडून शासनास प्राप्त झाली आहे.

वरील बाब विचारात घेऊन संदर्भाकित दि. २.०४.२०२४ रोजीच्या पत्रातील मुद्दा क्र. १ व २ येथील लेखांकन प्रक्रियेकरिता खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त उपरोक्त पत्रान्वये अन्य लेखाविषयक बाबींकरिता विहित केलेल्या कालमर्यादेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषद स्तर व पंचायत समितीस्तर:-

१. कोषागारातून प्राप्त होणारे रकमांचे लेखांकन पुर्ण करणे त्यानुषंगाने देयकांची जमा व खर्चाची ताळमेळ पुर्ण करण्याची कार्यवाही ही दिनांक २९ एप्रिल २०२४ पर्यंत पुर्ण करण्यात यावी.

२. जिल्हा परिषदेतील वित्त विभागाने व पंचायत समितीतील वित्त विभागाने लेखांकन पुर्ण करण्याची कार्यवाही ही दिनांक ३० एप्रिल २०२४ पर्यंत पुर्ण करावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.