शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये "पवित्र प्रणाली" अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.
शिक्षण आयुक्तांनी दि १९ एप्रिल २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि...
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या / खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती "अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी /विविध न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे.
संदर्भाधीन पत्रामध्ये नमूद केलेले शासन निर्णय व शासन पत्रातील तरतुदींनुसार जानेवारी, २०२४ मध्ये पवित्र पोर्टलवर प्राप्त जाहिरातींनुसार उमेदवारांच्या स्वप्रमाणपत्रातील नोंद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची त्यांनी नोंदविलेल्या प्राधान्यक्रमानुसार मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार दिनांक २५/०२/२०२४ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांच्यास्तरावर सुरू करण्यात आलेली होती...
दरम्यानच्या कालावधीमध्ये लोकसभा- २०२४ च्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता राज्यात लागू झाली आहे. यास्तव शासनाने पुढील कार्यवाही करण्यास मा. निवडणूक आयोगाकडे परवानगी देण्याबाबत विनंती केली असता संदर्भ क्रमांक ४ अन्वये शासनाने पवित्र पोर्टलमार्फत पहिल्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारात निवड झालेल्या ११०८५ उमेदवारांना त्यांच्या शिफारशी झालेल्या ठिकाणच्या त्या त्या जिल्हयातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच त्या जिल्हयातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिनांकानंतरच्या दिवसापासून नियुक्ती देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्यांनी करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
यास्तव यापुर्वी संदर्भ क्रमांक १ अन्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे मुलाखतीशिवाय या निवड प्रक्रियेतील उमेदवारांना आपल्याशी संबंधित मतदार संघातील प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर तात्काळ नियुक्ती देण्याबाबतची नियुक्ती प्राधिकारी म्हणून आपल्यास्तरावरील कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवडीसाठी शिफारस झालेली आहे यास्तव उमेदवाराची निवड झालेल्या पदासाठी पात्रता असल्याची खात्री करूनच नियुक्ती आदेश देण्याची दक्षता घेण्यात यावी.
पवित्र पोर्टलवर दिलेल्या सुविधेचा वापर करून उमेदवारांच्या रूजू बाबतचा अहवाल पोर्टलवर नोंद करावा व केलेली कार्यवाही आयुक्तालयास अवगत करावी.
अधिक माहिती साठी शिक्षण आयुक्तांचे खालील पत्र वाचा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .