नियतकालिक मुल्यांकन चाचणी PAT ३ अंतर्गत संकलित मूल्यमापन - २ आयोजनाबाबत ....

नियतकालिक मुल्यांकन चाचणी PAT ३ अंतर्गत संकलित मूल्यमापन - २ आयोजनाबाबत ....



SCERT ने दि ३१ मार्च २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचना दिल्या आहेत कि...............

नियतकालिक मूल्यमापन चाचणी - २ अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी चे आयोजन दिनांक ०४ ते ०६ एप्रिल २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित शाळांमध्येएकूण दहा माध्यमांसाठी इयत्ता तिसरी ते आठवी करीता प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा राज्यस्तरावरून करण्यात येत आहे.

संदर्भ क्र.५ नुसार संकलित मूल्यमापन २ चे आयोजन वेळापत्रकाप्रमाने करण्यात यावे.

संदर्भ क्र.२,३ व ४ नुसार प्रस्तुत कार्यालयामार्फत मागविलेल्या नमुन्यात जिल्ह्यांकडून प्राप्त सांख्यिकीय माहितीनुसार प्रश्नपत्रिका छपाई व वितरण करण्यात आले आहे.

याअनुषंगाने जिल्ह्यांकडून नियतकालिक मुल्यांकन चाचणी PAT ३) अंतर्गत संकलित मूल्यमापन - २ करीता प्राप्त तसेच कमी अथवा जास्त प्रश्नपत्रिका मिळाल्याबाबत मागणी संदर्भात दि. ३०.०३.२०२४ रोजी VC द्वारे सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था याची बैठक आयोजित करण्यात आली होती.

मा.संचालक यांनी सदर बैठकीत खालीलप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत.

• जिल्ह्यांनी सोबत दिलेल्या EXCEL sheet मध्ये दिलेल्या नमुन्यात इयत्ता, विषय व माध्यम निहाय कमी अथवा जास्त झालेल्या प्रश्नपत्रिकांची संख्या नमूद करून SOFT कॉफी व हार्ड कॉफी साक्षांकित करून evaluationdept@maa.ac.in या मेल वर दिनांक ०१.०४.२०२४ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवण्यात यावी. या नंतर प्राप्त संख्यांचा विचार केला जाणार नाही.

• तसेच कमी पडलेल्या प्रश्नपत्रिका आपल्या स्तरावरून गोपनीयता बाळगून झेरॉक्स करून शाळाना पुरविण्यात याव्यात. अनावश्यक झेरॉक्स काढल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

शासकीय कार्यपद्धतीनुसार कमीत कमी दराने झेरॉक्स करून त्याचे देयक शिक्षणाधिकारी यांनी एकत्रित सादर करावे.काही ठिकाणी जास्त प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्या असतील तर आपले स्तरावरून जेथे कमी असतील तेथे पोहचवाव्यात.

• संकलित मूल्यमापन २ साठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका या फक्त शासकीय शाळा, खाजगी अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या शाळांसाठीच पुरविण्यात आलेल्या आहेत. सदर प्रश्नपत्रिका विनाअनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी पुरविण्यात आलेल्या नाहीत.

• PAT ३ अंतर्गत या कार्यालयाकडील दि. २८/१२/२०२३ च्या पत्राप्रमाणे जिल्ह्यांकडून करण्यात आलेल्या मागणी पेक्षा प्रश्नपत्रिका कमी प्राप्त झाल्या असतील तरच झेरॉक्स देयक मान्य केले जाईल.

तसेच सदर झेरॉक्स देयक दिनांक १५.०४ २०२४ पर्यंत सदर कार्यालयास प्रत्यक्ष सादर करावेत.

गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

तरी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून आवश्यक माहिती दिलेल्या नमुन्यात सादर करावी व सदर संकलित चाचणी नियोजित दिनांकास होईल याची दक्षता घ्यावी.निवडणुकीबाबत काही ठिकाणी प्रशिक्षण असण्याची शक्यता आहे. तेथे फक्त वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय परीस्थितीनुरूप स्थानिक प्रशासनाने घ्यावा.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा 

download click here 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .