२०२४ - २५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांसाठी सूचना
पालकांसाठी सूचना
शासनाने दि १५ एप्रिल २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि
सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्ष पालकांना दिनांक १६.०४. २०२४ पासून लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. https://student.maharashtra.gov.in/adm_portal या लिंकवर पालकांना आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी नोंदणी करता येईल.
१. शाळा खालील कारणांमुळे आरटीई २५ टक्के प्रवेश नाकारु शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी व याबाबतची माहिती पोर्टलवर उपलब्ध असावी.-
■ अवैध निवासाचा पत्ता
■ अवैध जन्मतारखेचा दाखला ■ अवैध जातीचे प्रमाणपत्र ■ अवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र ■ अवैध फोटो आयडी ■ अवैध दिव्यांग प्रमाणपत्र
ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
• प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरु नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी.
• भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा • भाडेकरार हा अर्ज भरण्याच्या दिनांकाचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरार दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्यापालकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच प्रवेश आरटीई मधून झाला तरी ही संबधित पालकांनी संपूर्ण फी भरावी लागेल.
• विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमिटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा किंवा शासकीय शाळा नसतील व स्वयंअर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना २५ टक्के अंतर्गत सोडत पदधतीने प्रवेश दिला जाईल.
• अपवादात्मक परिस्थितीत विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यत शाळा नसेल तर विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्याने होतील.
Age limit ky ahe
उत्तर द्याहटवा27/3/2818
हटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .