शाळापूर्व तयारी अभियान २०२४-२५ ची यशस्वी अंमलबजावणीसाठी जबाबदारी निश्चित करणेबाबत
आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.
SCERT ने दि 8 एप्रिल २०२४ रोजी परिपत्रक काढून सूचित केले आहे कि....
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये संदर्भ १ अन्वये STARS २०२४-२५ नुसार या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या वालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियानाची” अंमलबजावणी करण्यात येत आहे.
संदर्भ क्र. २ नुसार सदर शाळापूर्व तयारी २०२४- २५ च्या यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षणाचे वेळापत्रक तसेच एकूणच उपक्रमाच्या अंमलबजावणीविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच दि. ८ एप्रिल २०२४ रोजी राज्यस्तरीय online प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर उपक्रमाची राज्यातील सर्व जिल्हयात यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी या उपक्रमाच्या अनुषंगाने विविध अधिकाऱ्यांच्या भूमिका व जवावदाऱ्या निश्चित करण्यात येत आहेत. त्या पुढील प्रमाणे .
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था / उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई भूमिका व जबाबदारी :-
१. जिल्हास्तरावरील प्रशिक्षणाचे राज्यस्तरावरील सूचनेनुसार नियोजन व अंमलवजावणी करणे.
२. मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना शाळापूर्व तयारी मेळाव्याच्या उदघाट्न तथा शाळा भेटी देण्यावावत निमंत्रित करणे.
३. जिल्हास्तरावरील प्रशिक्षणाच्या संदर्भातील डेटा पोर्टलवर भरणे.
४. जिल्हास्तरीय प्रशिक्षणानंतर तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे नियोजन करून आयोजनाची जवाबदारी गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सोपविणे व त्याच्या अंमलबजावणीचे सनियंत्रण करणे.
५. तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी व केंद्रस्तरीय कार्यशाळांना आपल्या कार्यालयातील तालुका संपर्क अधिकारी यांचे प्रशिक्षणाच्या भेटींचे नियोजन करणे व त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी आदेशित करणे. ६. जिल्ह्यातील तालुका व केंद्रस्तरावरील प्रशिक्षणाचा आढावा घेणे. संबंधित प्रशिक्षणाचा डेटा तालुकास्तरावरून गटशिक्षणाधिकारी तर केंद्रस्तरावरून केंद्रप्रमुख यांच्यामार्फत वेवपोर्टलवर भरणेविषयी पाठपुरावा करणे.
७. जिल्हा ते केंद्रस्तरीय प्रशिक्षणाचा अहवाल तयार करणे.
८. प्रशिक्षणाचा सविस्तर अहवाल तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडून शाळापूर्व तयारी अभियानाच्या अंमलवजावणीचा प्राप्त होणारा अहवाल यांचे एकत्रित अहवाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना सादर करणे.
९. शाळापूर्व तयारी मेळावे क्रमांक १ व २ यासाठी डायट मधील अधिका-यांनी मेळाव्यांना भेटी देण्यासाठी आदेशित करणे.
१०. सदर मेळाव्याचे नमुना आधारित मूल्यांकन करून त्या संदर्भातील डेटा पोर्टलवर भरण्यासाठी आपले अधिनस्त अधिकाऱ्यांना सुचित करणे.
११.शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक १ व २ या दरम्यान किमान १० गावांना भेट देऊन तेथील माता पालक गटातील कामाचा आढावा घेऊन त्या संदर्भातील माहिती वेबपोर्टलवर भरण्यासाठी आदेशित करणे. १२. जिल्ह्यातील या उपक्रमातील प्रशिक्षणांना वृत्तपत्र, दूरदर्शन वाहिनी, आकाशवाणी अशा माध्यमातून तसेच प्रसार माध्यमावर प्रसिद्धी देणे. (#ShalapurvaTayariAbhiyan 2024, व #शाळापूर्वतयारीअभियान२०२४ या हॅशटॅगचा (#) वापर करावा )
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/ शिक्षण निरीक्षक (मुंबई) भूमिका व जबाबदारी :-
१. जिल्हास्तरीय प्रशिक्षणानंतर तालुका आणि केंद्रस्तरावरील प्रशिक्षण आयोजन करण्यासंबंधित गटशिक्षणाधिकारी / केंद्रप्रमुख यांना सूचित करणे.
२. मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना मा. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयाने शाळापूर्व तयारी मेळाव्याच्या उदघाट्न तथा शाळा भेटी देण्याबाबत निमंत्रित करणे. ३. शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ आणि २ चे आयोजन करून सर्व शाळांमध्ये उत्साहाच्या वातावरणात संपन्न होईल यासाठी आवश्यक कार्यवाही करणे.
४. जिल्हा, तालुका, केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षीय यंत्रणेने प्रत्यक्ष मेळाव्यास भेटी देण्यासंदर्भात आदेशित करणे.
५. जिल्हास्तरारून सर्व क्षेत्रीय यंत्रणा / कर्मचारी / शिक्षक, पालक, माता यांना मेळावा सहभागी होण्याबाबत आवाहन करणे.
६. दोन्ही मेळाव्या दरम्यान माता पालकांच्या गटकार्यास पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या भेटी होण्यासाठी नियोजन करणे व त्याप्रमाणे कार्यवाही होत असल्याची खातरजमा करणे..
७. शाळापूर्व तयारी अभियान अंमलबजावणीकरिता शाळा भेटी तसेच माता-पालक गटांना भेटी करण्यासाठी विशेष पथक तयार करणे. या पथकामध्ये प्रथम संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश करणे.
८. माता-पालक गट भेट निरीक्षण आणि नमुना आधारित मूल्यांकन अहवाल दिलेल्या लिंकवर भरण्यास संबंधिताना सूचित करणे.
९. Dashboard वर उपलब्ध झालेल्या अहवालावर प्रत्येक १५ दिवसानंतर आढावा बैठका घेऊन त्यानुसार १००% शाळापूर्व तयारी मेळावे, माता-पालक गटाच्या मिटिंग, दाखल पात्र विद्यार्थ्यांची होणारी प्रगती या बाबी पोर्टलवर नोंदविण्यासाठी नियोजन करून कार्यवाही करून घेणे.
१०. शाळापूर्व तयारी अभियान २०२४-२५ अंतर्गत शाळापूर्व तयारी अभियानात सहभागी शाळा, विद्यार्थी व इतर सर्व यांची संख्यात्मक माहिती, निवडक दर्जेदार फोटोसह समाविष्ट करून याबाबतचा अहवाल तयार करून प्राचार्य, DIET यांचे मार्फत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांना सादर करणे.
११. जिल्ह्यातील या उपक्रमास वृत्तपत्र, दूरदर्शन वाहिनी, आकाशवाणी अशा माध्यमातून तसेच प्रसार माध्यमावर प्रसिद्धी देणे. ( #ShalapurvaTayariAbhiyan 2024, व #शाळापूर्वतयारीअभियान२०२४ या हॅशटॅगचा (#) वापर करावा)
१२. शाळापूर्व तयारी दुसऱ्या मेळाव्यानंतर शाळेत इयत्ता १लीत प्रत्यक्ष दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संबंधित शाळेतील शिक्षकांनी वेबपोर्टलवर भरण्याविषयी आदेशित करणे.
गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी (मनपा) भूमिका व जबाबदारी -
१. जिल्हास्तरावरील प्रशिक्षणासाठी प्राचार्य डायट यांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधित व्यक्तींना प्रशिक्षणास उपस्थित राहण्यासाठी कार्यमुक्त करणे.
२. प्राचार्य डायट यांच्या मार्गदर्शनानुसार तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करणे.
३. प्रत्यक्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तालुकास्तरावरील प्रशिक्षणासंबंधीची माहिती वेबपोर्टलवर भरणे.
४. आपल्या अधिनस्त केंद्रप्रमुखांना केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यासाठी आदेशित करणे.
५.
. सर्व केंद्रांमध्ये केंद्रस्तरीय प्रशिक्षण शिक्षण परिषदेच्या स्वरूपामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होईल याची खातरजमा करणे.
६. शाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने असणाऱ्या बेस्ट प्रॅक्टिसेस शिक्षणाधिकारी प्राथमिक तसेच प्राचार्य, डायट या कार्यालयास कळविणे.
७. तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय प्रशिक्षणाचा आढावा डायट प्राचार्य यांना सादर करणे.
८. तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक १ व २ उत्साहात संपन्न होतील याची खातरजमा करणे.
९. अधिनस्त केंद्रप्रमुखांना केंद्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडून शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक १ व २ या दरम्यान माता पालक व माता-पालक गटांकडून नियोजनानुसार शाळा पूर्वतयारी करून घेण्यासंदर्भातील सूचित करणे
१०. तालुक्यातील शाळांमध्ये होणाऱ्या शाळापूर्व तयारी मेळाव्यास प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी देण्याविषयी संबंधित केंद्रप्रमुख यांना सुचित करणे. (#ShalapurvaTayariAbhiyan 2024, व #शाळापूर्वतयारीअभियान२०२४ या हॅशटॅगचा (#) वापर करावा )
• केंद्रप्रमुखांची भूमिका व जबाबदारी
१. प्राचार्य डायट व गटशिक्षणाधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रस्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करणे.
२. केंद्रातील सर्व शाळा विशेषता: इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग असणाऱ्या सर्व शाळांतील सर्व शिक्षक संबंधित गावातील अंगणवाडी सेविका या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने आयोजित केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी उपस्थितीत राहतील याची खातरजमा करणे.
३. केंद्रस्तरावरील प्रशिक्षणाची माहिती वेबपोर्टल वर भरणे.
४. केंद्रातील सर्व गावांतील सर्व इयत्ता १ लीत दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी मेळवा उत्साहात आयोजित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे. आवश्यकतेनुसार संबंधित गावातील अनुदानित अथवा जिल्हा परिषद/ मनपा/ नपा या शाळेत मेळाव्याचे आयोजन करणे.
५. केंद्रातील विविध शाळांमध्ये होणाऱ्या शाळा पूर्वतयारी मेळाव्यास प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी देण्याविषयी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना सुचित करणे. (#ShalapurvaTayariAbhiyan 2024, व #शाळापूर्वतयारीअभियान२०२४ या हॅशटॅगचा (#) वापर करावा )
६. केंद्रातील शाळांमधील बेस्ट प्रॅक्टिसेस गटशिक्षणाधिकारी कार्यालय मार्फत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेस सादर करणे.
७. आपल्या केंद्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दोन्ही मिळाव्या दरम्यान दाखल पात्र मुलांचे पालक व माता पालक गट यांच्या माध्यमातून शाळापूर्व तयारी करून घेण्याबद्दल नियोजन करण्याविषयी अवगत करावे.
८. आपण स्वतः आपल्या कार्यक्षेत्रातील काही शाळांना व संबंधित गावांमधील इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी, माता पालक गट यांना भेटी देऊन मार्गदर्शन करावे व भेटीबाबतची माहिती व पोर्टलवर भरावी.
- शाळा प्रमुख किंवा मुख्याध्यापकाची भूमिका व जबाबदारी
१. केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी आपल्या शाळेतील शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी कार्यमुक्त करणे.
२. केंद्रप्रमुखांच्या सूचनेनुसार शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक १ व २ चे उत्साहात आयोजन करणे.
३. शाळापूर्व तयारी मेळाव्याचे नियोजन करण्यापूर्वी गावामध्ये या अभियानासंदर्भात आवश्यक जनजागृती करणे.
४. शाळापूर्व तयारी क्रमांक १ व २ यादरम्यान इयत्ता पहिली दाखल पात्र विद्यार्थ्यांची शाळापूर्व तयारी करून घेण्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या माता व माता पालक गट यांना मार्गदर्शन करणे.
५. दोन्ही मेळाव्या दरम्यान माता व माता पालक गटांकडून शाळापूर्व तयारी कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी शाळा स्तरावर नियोजन करणे.
६. इयत्ता १ लीत दाखल पात्र विद्यार्थी, माता पालक गट यांना क्षेत्रभेटी किंवा गृहभेटी देण्यासाठी शाळेतील शिक्षक गावातील अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने नियोजन व कार्यवाही करणे.
७. शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक १ व २ चे संदर्भातील निवडक फोटो व बातमीस विविध प्रसार माध्यमातून प्रसिद्धी देणे. (#ShalapurvaTayariAbhiyan 2024, व #शाळापूर्वतयारीअभियान २०२४ या हॅशटॅगचा (#) वापर करावा)
- ICDS विभागाची जबाबदारी
१. शाळापूर्व तयारी अभियान २०२४ च्या अंमलबजावणीसाठी ICDS विभागातील सर्व अधिकारी ते अंगणवाडी सेविका यांनी सक्रीय सहभाग घ्यावा.
२. जिल्हा, तालुका व केंद्रस्तर प्रशिक्षणासाठी सूचनेनुसार CDPO, पर्यवेक्षिका व सेविका यांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी कार्यमुक्त करणे.
३. शाळापूर्व तयारी अभियानासाठी दाखल पात्र बालके शोधण्यासाठी मदत करणे.
४. शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ व २ चे आयोजन करण्यासाठी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांना मदत व सहकार्य करणे.
५. शाळापूर्व तयारी दोन्ही मेळावे दरम्यान दाखलपात्र विद्यार्थी, माता पालक व माता पालक गट यांना भेटी देऊन शाळापूर्व तयारी कार्यक्रमाचा आढावा घेऊन वेबपोर्टल वर माहिती भरणे.
विशेष सूचना :
शाळापूर्व तयारी मेळावे आयोजित करताना सकाळच्या वेळेत आयोजित करावे. मेळाव्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच सावलीची व्यवस्था मेळाव्याच्या ठिकाणी असावी. मेळाव्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळेत अद्यावत प्रथमोपचार पेटी ठेवावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .