मराठा सर्वेक्षण : प्रगणक मानधनाबाबत
आपल्या जिल्हयातील / महानगरपालिकेतील प्रगणकांची संख्या व त्यांनी केलेले सर्वेक्षणाचे काम याची माहिती गोखले इन्स्टिटयूटकडून प्राप्त झालेली आहे. त्यानुसार त्यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या कामाचे मानधन आपण आयोगास कळविलेल्या बँक खात्यावर उपलब्ध करुन दिले आहे. गोखले इन्स्टिटयूटकडून प्राप्त आपल्या जिल्हयातील / महानगरपालिकेतील प्रगणकांची यादी सोबत जोडली आहे. त्या यादीतील रक्कम + रु.५०० प्रवास भत्ता प्रत्येक प्रगणकाच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावा.
सदर मानधन व खर्चाची रक्कम संबंधितांना अदा करुन २ महिन्यांच्या आत उपयोगिता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करुन द्यावे. काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास ९० दिवसांच्या आत आयोगाच्या खालील बँक खात्यावर परत करण्यात यावी ही विनंती.
खातेदाराचे नाव : RESEARCH OFFICER STATE B.C. COMMISSION PUNE
बँकेचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा : ट्रेझरी शाखा, पुणे
खाते क्रमांक: 11099453422
IFSC NO.SBIN0000454
आपली,
bopehl
(आ. उ. पाटील)
सदस्य सचिव
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे
बीड जिल्हाधिकारी कार्यालयाने दि 12 एप्रिल २०२४ रोजी काढलेले खालील आदेश पहा . इतर जिल्ह्यांचे देखील असेच आदेश लवकर येवू शकतात.
संदर्भ:- १. सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांचे आदेश क्र.प्र.क्र.१०२ / पुणे / ५१४ दि. १५.०३.२०२४
२. सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांचे पत्र क्र./मरामाआ/ प्र.क्र. ३५१/ २०२३ / प्रगणक/पुणे/६३७ दि. २८.०३.२०२४
उपरोक्त विषयी संदर्भ क्र. ०१ च्या आदेशान्वये प्रगणकास मागासवर्ग कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुटुंब रु.१० व मराठा/खुल्या कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुटुंब रु. १०० इतके मानधन निश्चीत करण्यात आले आहे असे नमूद करुन सोबतच्या तक्त्यामध्ये मराठा / खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण केलेल्या प्रगणकांना अदा करावयाच्या मानधनाचा बीड जिल्हयाचा तपशील दिलेला आहे.
तसेच संदर्भ क्र.०२ च्या पत्रान्वये प्रगणकांची संख्या व त्यांनी केलेले सर्वेक्षणाचे काम याची माहिती गोखले इन्स्टीटयूटकडून प्राप्त झाली असून त्यानुसार त्यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या कामाचे मानधन या कार्यालयाने मा. आयोगास सादर केलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया राजुरी वेस शाखा, बीड येथील खाते क्र. ६२००२५०८६५७ या बँक खात्यावर उपलब्ध करुन दिले आहे. गोखले इन्स्टिटयूटकडून प्राप्त जिल्हयाची प्रगणकांची तालुकानिहाय यादी सोबत देवून त्या यादीतील रक्कम + रु.५०० प्रवास भत्ता प्रत्येक प्रगणकाच्या बँक खात्यावर जमा करणे बाबत तसेच सदर मानधन व खर्चाची रक्कम संबंधीतांना अदा करुन २ महिन्यांच्या आत उपयोगीता प्रमाणपत्र आयोगास सादर करणे बाबत व काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास ९० दिवसांच्या आत आयोगाच्या बँक खात्यावर परत करणे बाबत कळविले आहे.
त्याअनुषंगाने संदर्भ क्र.०१ व क्र.०२ ची प्रत व तहसीलदार यांना द्यावयाच्या निधीच्या तालुकानिहाय तक्त्याची प्रत सोबत देण्यात येत असून सोबतच्या तक्त्यात नमूद प्रमाणे रक्कम संबंधीत तहसीलदार यांचे खात्यावर जमा करण्यात यावी.
अधिक माहिती साठी संपूर्ण परिपत्रक पहा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .