PM SHRI योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील शाळा निवडीच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत
आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.
PMSHRI School रजिस्ट्रेशन साठी येथे click करा
PMSHRI योजनेंतर्गत समता, प्रवेश, गुणवत्ता व सर्व समावेशक समग्र व्यवस्था असणारी उदाहरण दाखल शाळा, इतर शाळांना मार्गदर्शक ठरेल अशाप्रकारे देशभरातील १४,५०० शाळा विकसित करावयाच्या आहेत त्यानुषंगाने केंद्रशासनाने देशभरातील १०,०८० शाळांची निवड केली असून आपल्या राज्यातील पहिल्या टप्प्यात ५१६ शाळा व दुसऱ्या टप्प्यात ३११ शाळा अशा एकूण ८२७ शाळांची निवड करण्यात आलेली आहे हे आपणांस ज्ञात आहे.
१. केंद्रशासनाने संदर्भिय पत्र क्र. १ अन्वये PM SHRI (PM Schools for Rising India) शाळा निवडीकरिताचा तिसरा टप्पा दि. १५/०४/२०२४ पासून सुरू करण्यात येत असल्याबाबत कळविले आहे.
२. तिसऱ्या टप्प्यातील PM SHRI योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता पारदर्शकपणे शाळा निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन कार्यपध्दतीतील सूचनांचा अवलंब करून Bench Mark Schools म्हणून निश्चित असलेल्या शाळांनी स्वयं नोंदणी करावयाची आहे. ऑनलाईन PMSHRI पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित मार्गदर्शक सूचनेनुसार शाळा नोंदणी व जिल्हास्तरावरून पडताळणीबाबतची कार्यवाही कालमर्यादेत करणे बंधनकारक आहे. ३. त्यानुषंगाने उपरोक्तबाबत आपल्या स्तरावरून विहित वेळेत खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे अंमलबजावणी शाळांना स्वयं नोंदणी करण्याकरिता प्रोत्साहन व मदत करावी. PM SHRI योजनेतंर्गत शाळा नोंदणी व जिल्हास्तरावरून पडताळणीबाबतची कालमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .