संकलित मूल्यमापन - २ (PAT - ३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत

संकलित मूल्यमापन - २ (PAT - ३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत


आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

SCERT च्या दि 6 मे २०२४ च्या परिपत्रकानुसार......... 
गुण चाटवॉटवर नोंदविण्याकरिता दि.10 मे 2024 पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे.

उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG - २ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ (PAT -३)चे आयोजन करण्यात आलेले होते.उपरोक्त संदर्भांनुसार राज्यात संकलित मूल्यमापन - २ (PAT - ३) चे आयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित ( सर्व माध्यम), तृतीय भाषा - इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. सदर संकलित मूल्यमापन - २ (PAT-३)_शिक्षकांनी तपासणेवावत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून यावावतच्या सविस्तर सूचना यु- ट्युवद्वारे देण्यात आलेल्या आहेत.

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटवॉट संकलित मूल्यमापन - २ (PAT-३)गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन - २ (PAT-३)चे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटवॉटवर संकलित मूल्यमापन - २ ( PAT - ३)चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व यावावतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंकयापूर्वी सोवत देण्यात आलेली आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षण दि. १५ एप्रिल २०२४ रोजी यु-ट्युवद्वारे शिक्षकांना देण्यात आलेले आहे. यापूर्वी शिक्षकांना संकलित मूल्यमापन - २ (PAT- ३)चे गुण दि.१५ एप्रिल ते २६ एप्रिल २०२४ पर्यंत PAT (महाराष्ट्र) या चाटवॉटवर नोंदविणे करिता कालावधी देण्यात आलेला होता.

तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने सदरचे गुण चाटवॉटवर नोंदविण्याकरिता जिल्ह्यांना दि.10 मे 2024 पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. उपरोक्त कामासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जवावदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटवॉटवर संकलित मूल्यमापन - २(PAT -३)चे गुण कसे भरावेत यावावत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन - २ (PAT-३)घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटवॉटवर नोंदविणेवावत कार्यवाही करण्यात यावी. चाटवॉटच्या वावतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोवत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा. तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना यावावतची आवश्यक कार्यवाही करण्यावावत सूचित करण्यात यावे.

  • चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी खालील दिलेल्या गुगल लिंकवर तक्रार / प्रतिसाद नोंदवावा.

https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA


  • यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन )

https://youtube.com/live/xnnTpdMylxY?feature=share


  • PAT -३ चाटबॉट मार्गदर्शिका :

https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RI_QhbVIj2D7qQgW5Zj6/view?usp=sharing


  • संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २ ( PAT-३)

https://cgweb.page.link/HhMEqoqKD43dnJdV7


अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.