NMMS , 2023-2024 निवड यादी, गुण यादी

  NMMS , 2023-2024 निवड यादी,गुण यादी  



गुण यादी पाहण्यासाठी येथे click करा 

(सिट नंबर व आईचे नाव आवश्यक )


 (NMMS) 2023-2024 ची जिल्हा निहाय व CASTE  निहाय निवड यादी पाहण्यासाठी येथे click करा 


NMMS शाळा login व सर्व माहिती करिता येथे click करा.


निवड प्रकिया जाणून घेण्यासाठी येथे click करा.


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२३-२४ इ.८ वी साठी परीक्षा दिनांक २४ डिसेंबर, २०२३ ची शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादीबाबत. सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा हेतू आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती इ. ९ वी ते १२ वी पर्यंत (चार वर्षांसाठी) मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु.१०००/- आहे (वार्षिक रु.१२,०००/-).

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची ( NMMS) विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी दिनांक ०७.०२.२०२४ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना / पालकांना शाळेमार्फत जात, दिव्यांगत्व, जन्म दिनांक इ. बाबतची दुरुस्ती असल्यास दि. १६.०२.२०२४ पर्यंत परिषदेकडे ऑनलाईन पाठविणेबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी/पालकांनी शाळेमार्फत पाठविलेल्या दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी शुक्रवार, दिनांक १२.०४.२०२४ रोजी जाहीर करण्यात येत आहे.

दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षसाठी २६६३५२ विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११६८२ शिष्यवृत्ती कोटा शिक्षण मंत्रालय (MoE), नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी ४% आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व ८. वीची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हयानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. सदरची निवडयादी व गुणयादी शुक्रवार, दिनांक १२.०४.२०२४ रोजी पासून पाहता येईल.

अधिक माहिती साठी खालील पत्र वाचा




Tags

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .