प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणेबाबत
आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.
दि १९ एप्रिल २०२४ रोजी शिक्षण संचालकांनी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याने त्यावावत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे संदर्भात शासनाने संदर्भिय पत्र क्र. १ मधील मुद्दा क्र. १ नुसार राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२/०४/२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत दिली आहे. संदर्भिय पत्र क्र. २ नुसार संचालनालयाने शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक ०२/०५/२०२४ पासून सुट्टी जाहीर केलेली आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीतील कार्यदिनाकरीता नियमानुसार देय असणारा तांदुळ व धान्यादी माल कोरडा शिधा स्वरुपात वाटप करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात यावेत. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .