लोकसभा निवडणुक 2024 सार्वजनिक सुट्टी बाबत अधिसूचना राजपत्र

 लोकसभा निवडणुक 2024 सार्वजनिक सुट्टी बाबत अधिसूचना राजपत्र 



आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

महाराष्ट्र शासनाने दि 3 एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना काढून राजपत्र प्रसिद्ध केले आहे कि.......

अधिसूचना

क्रमांक सार्वसु-१०२४/प्र.क्र. ३३/जपुक (२९). - परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१चा २६) च्या कलम २५ मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८-जेयुडीएल-तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे सार्वत्रिक लोकसभा निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने खालील अनुसूचित दर्शविलेल्या मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत आहे.




महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - मध्य उप-विभाग, एप्रिल ३, २०२४ / चैत्र १४, शके १९४६

२. ही सार्वजनिक सुट्टी उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांनादेखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाच्या कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील.

३. सदर अधिसूचनाची माहिती व जनसंपर्क विभाग यांनी वृत्तपत्र व इतर प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रो. दि. कदम-पाटील,

शासनाच्या उप सचिव.

अधिक माहिती साठी राजपत्र download करण्यासाठी येथे click करा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.