भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत



प्राथमिक शिक्षण संचानालयाने दि 5 एप्रिल २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून निर्देश दिले आहेत कि 

मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सन 2024 मध्ये आयोजित करण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक 27.12.2023 च्या परिशिष्टानुसार कळविण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भारतीय लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी करण्याबरोबरच त्यांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्टया मौलीक असे योगदान भारतीय समाजाला दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची समाजाला व विशेषतः शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याशी संबंधीत विषयावर परिसंवाद, त्यांच्या विचारधारांवर आधारित ग्रंथोत्सव, निबंधस्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच त्यांच्या कार्याशी संबंधीत इतर नाविन्यपूर्ण उपक्रम / कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

संदर्भाधीन शासन निर्देशानुसार कार्यवाही करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.