मार्च अखेर कामांचे कारण न देता राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च २०२४ चे वेतन रमजान ईद व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ५ तारखेच्या आत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचान्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश त्वरीत निर्गमित करण्याबाबत.

मार्च अखेर कामांचे कारण न देता राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च २०२४ चे वेतन रमजान ईद व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ५ तारखेच्या आत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचान्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश त्वरीत निर्गमित करण्याबाबत.





शिक्षण संचानालयाने राज्याच्या शिक्षण सचिवांना दि २९ मार्च २०२४ च्या पत्रानुसार विनंती केली आहे कि 

संदर्भ :-

१) मा. श्री. श्रीकांत गोविंदरव देशपांडे माजी विधान परिषद सदस्य यांचे दि.२०/३/२०२४ चे निवेदन मा. शिक्षण आयुक्तालयाचे दि. २७/३ / २०२४ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त.

२) श्री. शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, सिल्लोड यांचे पत्र क्र. SAR/H2H/MRJPHS/24-09/ ईद व जयंती निमित्य वेतन दि १८/३/२०२४ चे निवेदन मा. शिक्षण आयुक्तालयाचे दि. १९/३/२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त.

३) श्री. प्रविण खाडे, राज्य महासचिव, महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघ, पुणे यांचे दि. १७/०३/२०२४ चे निवदेन


मा. श्री. श्रीकांत गोविंदराव देशपांडे माजी विधान परिषद सदस्य यांचे दिनांक २०/ ०३ / २०२४ च्या निवेदनाद्वारे तसेच श्री. शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, सिल्लोड यांनी त्यांचे दिनांक १८/०३/२०२४ च्या निवेदनाद्वारे व श्री. प्रविण खाडे, राज्य महासचिव, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघ, पुणे यांनी त्यांचे दिनांक १७ /०३ /२०२४ च्या निवदेनाद्वारे राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च २०२४ चे वेतन रमजान ईद व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ५ तारखेच्या आत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत संदर्भिय निदेवदाद्वारे मागणी केली आहे.

तरी संबंधित निवेदनातील मागणीनूसार रमजान ईद व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माहे मार्च २०२४ च्या वेतनाकरीता निधी दिनांक ०२/०४/२०२४ पर्यंत उपलब्ध होण्याबाबत शासनस्तरावरुन उचित ते निर्देश व्हावेत ही विनती.

अधिक माहिती साठी खालील पत्र वाचा




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.