"मा.मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात 1 मार्च २०२४ रोजी जो निर्णय घोषित केला, त्यानुसार 1 नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचार्यांना होणार हे लाभ

"मा.मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात 1 मार्च २०२४ रोजी  जो निर्णय घोषित केला, त्यानुसार 1 नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचार्यांना होणार हे लाभ 









"मा.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे" सरकारने विधीमंडळात 1 मार्च २०२४ रोजी जो निर्णय घोषित केला आहे त्यामुळे कर्मचारी-शिक्षकांना १८ वर्षानंतर सुधारित निवृत्ती वेतन प्रणालीत खालील लाभ प्राप्त होणार आहेत.


१. सद्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ज्यांना NPS प्रणाली मध्ये निवृत्तीवेतन घ्यायचे आहे किंवा राज्य शासनामार्फत सुरु होणाऱ्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हावयाचे आहे याबाबत विकल्प द्यावा लागेल.


२. राज्याच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेनुसार कर्मचाऱ्याची २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह अनुज्ञेय राहील.


३. २० वर्षांपेक्षा कमी सेवा होऊन सेवानिवृत्ती होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह दिले जाईल.

४. सेवेत असताना निधन पावल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांस कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर केले जाईल. (महागाई भत्त्यासह)


५. सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्युनंतर त्याला निश्चित होणाऱ्या निवृत्तीवेतनाच्या ६० टक्के रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून अदा करण्यास मान्यता.


६. या योजनेसाठी संचालक, लेखा व कोषागारे यांच्या अंतर्गत स्वतंत्र निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येईल.


७. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाही. फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहतील.


८. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांनाही पेन्शनचा नवा पर्याय खुला असेल.


९. ज्यांना पेन्शन नको असेल, अशा कर्मचाऱ्यांना एकरकमी देण्याचाही पर्याय सरकारने खुला ठेवला आहे.


१०. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर.


११. अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय.


१२. गट विमा योजनेची रक्कम अनुज्ञेय.



( विश्वास काटकर )

निमंत्रक

समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

तथा

सरचिटणीस, मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र मोबा. ९८२१००४२३३


निमंत्रक श्री विश्वास काटकर यांचे प्रसिद्धी पत्रक सविस्तर खाली वाचा

download click here


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.