महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९७७ महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील अनुसूची फ परिच्छेद २ मध्ये केलेल्या दुरुस्तीबाबत.

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९७७ महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील अनुसूची फ परिच्छेद २ मध्ये केलेल्या दुरुस्तीबाबत.

संदर्भ :

१) महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, दि. २५ मार्च २०२३, असाधारण क्रमांक ९९.

शालेय शिक्षण विभाग, दि. २४ मार्च २०२३ अन्वये प्रसिद्ध केलेली अधिसूचना.

२) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. १८४७ दि.१३.४.२०२३ व क्र. ४४३०, दि. २९.८.२०२३.

३) सचिव, पदवीधर डी. एड. कला क्रीडा शिक्षक-शिक्षकेतर संघ, पुणे यांचे दि.६.२.२०२४ चे पत्र.(प्राप्त दि.२०.२.२०२४.)

(४) शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३९/टिएनटी-१, दि.१.२.२०२४.



माध्यमिक शिक्षण संचालकांनी दि 12 मार्च २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भातील अ.क्र. १ चे अधिसूचनेनुसार महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९७७ महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील अनुसूची फ परिच्छेद २ मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे.

२/- सदर सूचनेस अनुसरुन संचालनालयाचे संदर्भ क्र. २ वरील दि.१३.४.२०२३ व २९.८.२०२३ च्या परिपत्रकान्वये शासन अधिसूचनेत दिलेल्या तरतूदी आणि सर्व टिपा / तळटिपा यांच्या आधारे शिक्षकांची सेवाजेष्ठता निश्चित करण्याची कार्यवाही करणेबाबत आपल्या विभागातील/जिल्हयातील शाळांना कळविण्यात यावे. जेथे सेवाजेष्ठतेबाबत वाद निर्माण होतो अशा प्रकरणात शिक्षणाधिकारी यांनी तक्रारीच्या अनुषंगाने सुनावण्या घेऊन अद्ययावत शासन निर्णय, अधिसूचना दि.२५.३.२०२३ प्रमाणे नियमानुसार कार्यवाही करावी. शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सेवाजेष्ठतेच्या निर्णय प्रकरणी अपिल झाल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दि.२५.३.२०२३ नुसार नियमसंगत उचित कार्यवाही दक्षतेने पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या संचालनालयास सादर करण्यासही कळविण्यात आले आहे. तथापि अद्यापि आपल्या स्तरावरुन करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल या संचालनालयास प्राप्त झालेला नाही.

प्रकरणी संदर्भ क्र.३ वरील संघटनेच्या पत्रान्वये मा.उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका क्र. ११२४३ / २०२३ मधील दि.७.९.२०२३ रोजीच्या आदेशाचा योग्य अर्थ न काढल्याने संस्थाचालकानी बी.एड. नियुक्त शिक्षकांना प्रथम प्राधान्य देत जेष्ठता याद्या तयार केल्या व या चुकीच्या सेवाजेष्ठता याद्यांनुसार असलेल्या पदोन्नतीस मान्यता देण्यात येत असल्याचे त्यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याचिका क्र. १९२४३ / २०२३ मधील दि.१८.१.२०२४ च्या अंतरिम आदेशानुसार स्पष्ट करण्यात आले आहे की, सेवाजेष्ठता याद्या ह्या दि. २४.३.२०२३ च्या राजपत्रानुसार असाव्यात. सदर राजपत्र डावलून दिलेल्या पदोत्रती मान्यता या न्यायालयीन अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहेत. त्यामुळे चुकीच्या पदोन्नती प्रस्तावांना मान्यता देऊ नयेत असे स्पष्ट निर्देश आहेत.

तसेच प्रकरणी शासनाचे संदर्भ क्र.४ वरील पत्रान्वये मा. उच्च न्यायालयाच्या दि. १८.१.२०२४ च्या आदेशाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन शासनाच्या दि.२४.३.२०२३ च्या अधिसूचनेतील तरतूदी यांच्या आधारेच शिक्षकांची सेवाजेष्ठता निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच उच्च न्यायालयाच्या दि. १८.१.२०२५ च्या आदेशाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.

HTML

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.



टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. 24/03/23 ची अधिसूचना पाठवा

    उत्तर द्याहटवा
  2. Sir sevantargat M.A.B.ED.karaylach jr ushir zala tr tya teacherchi sevajeshthta vicharat ghenar ka?

    उत्तर द्याहटवा
  3. Karan sir ,33varsh jobla houn tyachya retirement 4varshani aslyavar tyachi sevajeshtha lakshat gheun pramotion kadhi honar?

    उत्तर द्याहटवा
  4. दि.२४/०३/२०२३ ची अधिसूचना व दि.१८/०१/२०२४ चे न्यायालयीन आदेश पाठवावेत,ही विनंती.

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .