सेवाजेष्ठता बाबत

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या रातो) विनियमन अधिनियम १९७७, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या रातो) नियमावली १९८१ मधील अनुसूची फ परिच्छेद २ मध्ये केलेल्या दुरुस्ती बाबत आगखी स्पष्टता होणेबाबत.



आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.


संदर्भ

१) महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, दि. २५ मार्च २०२३, असाधारण क्रमांक ९९, शालेय शिक्षण विभाग, दि. २४ मार्च २०२३ अन्वये प्रसिद्ध केलेली अधिसूचना.

२) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. १८४७, दि.१३.४.२०२३ व क्र.४४३०, दि.२९.८.२०२३.

३) शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३९/दिल्ली-१, दि.१.२.२०२४.

४) संचालनालयाचे क्र.१३२०, दि.१२.३.२०२४ चे परिपत्रक

५) शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांचे जा.क्र. शिवसं/को/मावि-३/२०२४/२६६५, दि.२०.३.२०२४.

६) शिक्षण उपसंचालक, नागपूर यांचे जा.क्र. शिवसं/ माध्यम / २२६७/२०२४, दि.२१.३.२०२४.


शिक्षण संचनालयाने दि २७ मार्च २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार....


प्रस्तुत प्रकरणी संचालनालयाचे संदर्भाय पत्र क्र.४ संबंधी आणखी सष्टता होणे आवश्यक असलेबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर व विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी संचालनालयास विनंती केली आहे.

२/- शासन अधिसूचना दि.२४.३.२०२३ अन्वये महाराष्ट्र खाजगी शाळांतील (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील अनुसुचीफ परिच्छेद २ मध्ये बदल करण्यात आलेला आहे. सदरील अधिसूचने संबंधी संदर्भाय पत्र क्र. २ अन्वये विस्तृत सूचना अधिनस्त कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. तथापि संदर्भाय पत्र क्र.५ व ६ च्या अनुषंगाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासन राजपत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि.२४.३.२०२३ मधील तरतूदी (टीपा व तळटीपांसह) व मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्र. ११२४३/२०२३ मधील दि.१८.१.२०२४ रोजीच्या अंतरिम आदेशानुसार शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

सुलभ संदर्भाकरिता शासन राजपत्र दि. २४.३.२०२३ ची प्रत व मा.उच्च न्यायालयाचा दि.१८.१.२०२४ रोजीचा अंतरिम आदेश सोबत संलग्न करण्यात येत आहे.


अधिक माहिती साठी खालील पत्र पहा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.