प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम सन २०२३-२४ आयोजन करणे बाबत...

 प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम सन २०२३-२४ चे आयोजन करणे बाबत...




व्हीडीओ link अपलोड करण्यासाठी येथे click करा


SCERT ने दि २९ फेबुवारी २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचना दिल्या आहेत कि....

उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार, रंगोत्सव कार्यक्रमात, सादरीकरण करण्याच्या दृष्टीने शाळांतील इयत्ता ३री ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी / शिक्षकांसाठी राज्यस्तरावरील रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अनुभवात्मक शिक्षणामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग,स्वयं-पुढाकार, स्वयं - दिशा, स्वयं शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी खूला आहे. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत शाळांनी Arts Integration, Sports Integration, Toy Based Pedagogy, व Story Telling या चार मुद्द्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांना विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओ https://forms.gle/xHJA1X9TbBpbV3Ji6 या लिंकमध्ये माहिती भरून अपलोड करावयाचे आहेत.

राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आणि प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांनी आपल्या जिल्ह्यात शिक्षणाधिकारी (प्राथ.) व शिक्षण निरीक्षक (पश्चिम,दक्षिण व उत्तर ) मुंबई. यांचे सहकार्याने सर्व शाळांना याबाबतचे परिपत्रक काढून परिषदेकडील पत्रात दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे आणि व्हिडीओची लिंक पेस्ट करणे याबाबत सूचित करावयाचे आहे. दि. ७ मार्च २०२४ ही जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम तारीख आहे. आपल्या जिल्ह्यांतील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार उपरोक्त लिंकमध्ये माहिती भरून वरील ४ प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या एक किंवा प्रत्येक प्रकारातील एक या प्रमाणे व्हिडीओची लिंक दि. ७ मार्च २०२४ पर्यंत लिंकवर पेस्ट करणे हे करणे अपेक्षित आहे.

तद्नंतर लिंकवर प्राप्त व्हिडीओंचे परीक्षण करण्यासाठी राज्यस्तरावर ३ परीक्षकांची एक समिती गठीत करून उत्कृष्ठ व्हिडीओंची निवड करण्यात येऊन दि. १८ व १९ मार्च रोजी राज्यस्तरावर प्रत्यक्ष सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाईल.

राज्यस्तरावर प्रथम प्रत्येक प्रकारातील एका गटास, विविध उत्कृष्ट कृतीं पैकी उत्तम सादरीकरण,उत्तम परिणामकारकता, गटातील एकसंघ भावना इत्यादी करिता प्रमाणपत्र देण्यात येतील तसेच सर्व सहभागी गटांना प्रमाणपत्रे दिली जातील. राज्यस्तरावर उपस्थित राहणाऱ्या संघांना प्रवासभत्ता, निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात येईल.

यासाठी आपल्या अधिनस्त सर्व कार्यालये व शाळांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील असे पाहावे. रंगोत्सव कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व्हिडीओ राज्यस्तरावरून दिलेल्या लिंकवर पेस्ट करणेसंबंधित मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी.

सोबत- १. मार्गदर्शक सूचना मा. संचालकांच्या मान्यतेनुसार

link भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना

  • रंगोत्सव कार्यक्रम २०२३-२४ साठी ही माहिती संकलित करण्यात येत आहे. 
  • संपूर्ण माहिती  मराठी  भाषेमध्ये  लिहावी. फोन  क्र. व ईमेल आय डी बरोबर लिहावेत. 
  • ३ री  ते ८ वी च्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या  शाळा रंगोत्सव कार्यक्रमामध्ये  सहभागी होण्यासाठी यात माहिती भरू शकतात.
  • शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील गोष्टी , खेळ आधारित अध्यापन, कला व क्रीडा या माध्यमातून शिक्षण (Experiential Learning) यासंबंधी ५ मिनिटांचा व्हिडीओ तयार करून त्याची लिंक अपलोड करावयाची आहे.
  •  प्रत्येक शाळा एक कृती किंवा उपक्रम याची  नोंदणी करू शकतात.


अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.