अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी ऑफलाईन पध्दतीने राबविणेबाबत.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी ऑफलाईन पध्दतीने राबविणेबाबत.


समाज कल्याण आयुक्तालयाने २६ मार्च २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार

उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२३ - २४ पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्याबाबत आपणास आयुक्तालयाचे दि.०१.०२.२०२४ चे पत्रान्वये निर्देश देणेत आलेले होते. तथापि संदर्भिय पत्रान्वये मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन २०२३ - २४ साठी ऑफलाईन पध्दतीने राबविण्यास शासन स्तरावरुन मान्यता देणेत आलेली आहे.

तरी संदर्भिय शासन पत्रामध्ये नमूद केलेप्रमाणे योजनांची अंमलबजावणी करुन पात्र सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ अदा करणेची कार्यवाही तात्काळ करणेत यावी. तसेच प्राप्त निधी वेळेत खर्च करणेत यावा. यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी. शिष्यवृत्तीच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहिल्यास आपणास व्यक्तीश: जबाबदार धरणेत येईल याची नोंद घ्यावी.



महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने २६ मार्च २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार

उपरोक्त पत्रान्वये, आपण शैक्षणिक वर्ष २०२३ २४ साठी प्रि मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनांपैकी खालील ५ योजना Offline पध्दतीने राबविण्याची परवानगी मागीतलेली आहे.

१. इ. ९ वी व १० वी मध्ये शिकणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

२. साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

३. इ. ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

४. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती

५. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क

आपण सादर केलेल्या प्रस्तावानुसार वर नमूद केलेल्या सर्व शिष्यवृत्तीसाठी https://prematric.mahait.org/Login/Login या महाडिबीटी प्रणालीच्या वेब लिंकवरील कामकाजाची सद्यस्थितीचा आढावा घेतला असता सदर योजना ३१ मार्च पुर्वी कार्यरत होवून अर्ज अंतीमरित्या निकाली निघणे शक्य नाही.

४.सदर बाब तसेच आपण सादर केलेला प्रस्ताव विचारात घेता सन २०२३-२४ साठीचा प्राप्त निधी अखर्चित राहू नये तसेच अनुसूचित जातीचे पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी उपरोक्त "५" योजना सन २०२३-२४ साठी Offline पध्दतीने राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अधिक माहिती साठी खालील दोन्ही (एकत्रित) परिपत्रक वाचा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.