सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता जिल्हयांतील आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करणेबाबत.
आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.
प्राथमिक शिक्षण संचानालयाने दि १८ मार्च २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि
उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला / मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ नुसार सुधारित नियम नमूद केलेले आहेत. पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन दिनांक ६/०३/२०२४ ते दिनांक १८/०३/२०२४ या कालावधीमध्ये करण्याबाबत संचालनालयाचे दिनांक ०६.०३.२४ अन्वये निर्देश देण्यात आलेले होते.
तथापि काही जिल्हयांचे पुर्ण शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन न झाल्यामुळे याव्दारे दिनांक २२.०३.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत पात्र असलेल्या शाळांचे १०० टक्के रजिस्ट्रेशन विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी. यापूढे कसल्याही परिस्थीतीत मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .