सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता जिल्हयांतील आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करणेबाबत.
शिक्षण संचालकांनी दि 6 मार्च २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून निर्देश दिले आहे कि...
उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खालील व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला / मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
शासनाच्या संदर्भ क्र.१ च्या पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत. तसेच त्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ अधिसूचना निर्गमित झालेली असून सदर अधिसूचनेमध्ये सुधारित नियम नमूद केलेले आहेत.
त्यानुसार खालील नमूद व्यवस्थापनाच्या पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करण्यात यावे.
- महानगरपालिका शाळा (Municipal Corporation)
- नगरपालिका/ नगरपरिषद/नगर पंचायत शाळा (Nagar Palika/Nagar Parishad/Nagar Panchayat)
- कॅन्टोमेंट बोर्ड शाळा (Contonment Board)
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (Zilla Parishad (Primary ) )
- महानगरपालिका शाळा (स्वयंअर्थसहाय्यीत) (Municipal Corporation (self funded))
- जिल्हा परिषद (माजी शासकीय) (Ex. Govt )
- खाजगी अनुदानित (Private Alded )
- स्वयंअर्थसहाय्यीत शाळा (Self Financed )
- पोलिस कल्याणकारी शाळा ( विनाअनुदानित) (Police Welfare (Unaided))
त्यानुसार दरवर्षीप्रमाणे सन २०२४-२५ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. त्याकरीता आपल्या जिल्हयातील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी दिनांक ६/०३/२०२४ ते दिनांक १८/०३/२०२४ या कालावधी मध्ये करण्यात यावी. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे.
तरी आपल्या जिल्हयातील शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन विहीत कालावधीत पूर्ण करण्यात यावे. ज्या जिल्हयांतील आरटीई अंतर्गत पात्र असलेल्या शाळांचे १०० टक्के रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व प्रशासन अधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .